Advertisement

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशक

विद्यार्थ्यांना मानसिक दडपणातून बाहेर काढून त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी ऑनलाइन समुपदेशक
SHARES

येत्या २१ फेब्रुवारीपासून बारावीची तर १ मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा काळात दडपण येते. अनेक विद्यार्थ्यांच्या मनात भितीमुळे नकारात्मक भावना निर्माण होते. या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं ऑनलाइन समुपदेशक नेमले आहेत. हे समुपदेशक विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार असून यासाठी एकही पैसा घेतला जाणार नाही


आता टेंशन नॉट

बारावीच्या परीक्षेसाठी अवघे ८ दिवस शिल्लक आहेत. तर दहावीच्या परीक्षेसाठी केवळ १६ दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास होईल का? पेपर चांगला जाईल का? पेपर वेळेत पूर्ण होईल का? नापास झालो तर? असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनात डोकावत असतात. यामुळे त्यांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातच पेपर अवघड गेल्यानं अनेक विद्यार्थी आत्महत्येचाही मार्ग स्वीकारतात. अशा विद्यार्थ्यांना मानसिक दडपणातून बाहेर काढून त्यांच्या मनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली आहे.


मोबाईलवरुन समुपदेशन

समुपदेशक परीक्षा काळात सकाळी ८ ते रात्री ८ या कालावधीत मोबाइल फोनवरून नि:शुल्क समुपदेशन करणार आहेत. अशाप्रकारे समुपदेशनासाठी विद्यार्थ्यांनी ७७६७९६०८०४, ८६६८३९२२३२, ८४५९११२१३३, ९६१९६४३७३० या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहन मंडळाकडून करण्यात आलं आहे.



हेही वाचा

वाहतूक कोंडीमुळे आणखी २० विद्यार्थ्यांच्या करिअरला ब्रेक

शालेय विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा