मुमताझ काझी यांना स्त्री शक्ती पुरस्कार

 Mumbai
मुमताझ काझी यांना स्त्री शक्ती पुरस्कार

मुंबई - जागतिक महिलादिनाच्या निमित्तानं मध्य रेल्वेच्या मोटारवुमेन मुमताझ काझी यांना रेल्वे मंत्रालयाचा नारी शक्ती पुरस्कार देऊन गौवरण्यात येणार आहे. जागतिक महिलादिनाच्या निमित्तानं जगभरात स्त्रीशक्तीचा गौरव केला जातो. अनेक कर्तृत्ववान महिलांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येतं. महत्त्वाची कामगिरी केलेली मुमताज काझी हिला जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते नारी शक्ती पुस्कार देऊन गौवरण्यात येणार आहे.

मोटरमॅन हे क्षेत्र पुरुषांची मक्तेदारी समजली जात होती. अशा नोकऱ्यांकरिता तरुणी, महिला कधीच पुढे येत नव्हत्या. पण मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म झालेल्या मुमताझ काझी यांनी ही समजूत खोटी ठरवली आहे. ही महिला आशियातील पहिली डिझेल लोकोमोटिव ड्रायवर आहे. त्या 25 वर्ष ट्रेन चालवत आहे. मुमताज काझी मुंबई सीएसटी ते पनवेल या मार्गावर लोकल ट्रेन चालवतात. त्या केवळ भारतीय रेल्वेतच नव्हे तर आशियातील पहिल्या महिला डिझेल लोको पायलट ठरल्या आहेत. तसंच त्यांच्या नावाची नोंद डिझेल रेल्वे इंजिन चालवणारी पहिल्या महिला चालक अशी लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्येही आहे.

Loading Comments