Advertisement

बिग बॉसमध्ये होणार 'हिशोब पाप पुण्याचा'

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. दर आठवड्याला कोणी एक सदस्य घराबाहेर जाणे हे अनिवार्य आहे. त्यामुळं या आठवड्यात कोणाच्या पाप पुण्याचा हिशोब होतो ते पहायचं आहे.

बिग बॉसमध्ये होणार 'हिशोब पाप पुण्याचा'
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. दर आठवड्याला कोणी एक सदस्य घराबाहेर जाणे हे अनिवार्य आहे. त्यामुळं या आठवड्यात कोणाच्या पाप पुण्याचा हिशोब होतो ते पहायचं आहे.


नॉमिनेशन टास्क रंगणार 

आज सदस्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा नॉमिनेशन टास्क रंगणार आहे. बिग बॉसच्या घरातील सदस्यांचं भवितव्य नशिबावर आणि त्यांच्या बऱ्या-वाईट कामांवर अवलंबून असतं. घरातील सदस्यांनी आजवर केलेल्या चुका, चांगली काम यांना तपासण्यासाठी बिग बॉस सदस्यांवर 'हिशोब पाप पुण्याचा' हे नॉमिनेशन कार्य सोपवणार आहेत. या कार्यात इतर सदस्यांना स्वर्गात पाठवून सेफ करायचं कि नरकात पाठवून नॉमिनेट करायचं याचा निर्णय कार्यप्रमुख आणि त्यांचे दोन सल्लागार यांच्यावर अवलंबून असणार आहे. आता कार्यप्रमुख आणि सल्लागार कोणाला वाचवणार आणि कोणाला नॉमिनेट करणार हे पहायला मिळेल.


पराग-माधवमध्ये वाद 

या टास्कमध्ये परागनं अभिजीत केळकरवर झालेले आरोप सल्लागार माधव आणि नेहा तर कार्यप्रमुख शिवला पुन्हा एकदा सांगितले. ज्यामध्ये पराग आणि माधवमध्ये बरेच वाद विवाद झाले. परागनं असं देखील सांगितलं कि, या तिघांवर माझा विश्वास नाही. तुम्हाला हवा तो निर्णय घेऊन टाका. म्हणजेच शिव, माधव आणि नेहावर त्याचा विश्वास नाही. आता या दोघांमध्ये कोण वाचणार आणि कोण नॉमिनेट होणार ते पाहूया. यात पराग काही चलाखी करतो का ते पहाणंही महत्त्वाचं ठरणार आहे.


पाप-पुण्याच्या फेऱ्यात 

किशोरी शहाणे यांनी सुरेखा पुणेकर यांच्याविषयी त्यांचे मुद्दे मांडले, ज्यामध्ये त्या म्हणाल्या की, त्यांना जोपर्यंत कोणी काम सांगत नाही, तोपर्यंत त्या घरात स्वयंपाक करत नाहीत, त्यांना सांगितलं तरच त्या उठतात, बऱ्याचदा तर त्या झोपूनच असतात, त्या सिनियर आहेत त्यामुळं त्यांना कोणी काही बोलत नाही. आजपर्यंत कधीही माझ्यासाठी कोंबडा आरवला नसल्याचंही किशोरी म्हणाल्या. त्यावर सुरेखा यांनीही त्यांची बाजू मांडली. त्या म्हणाल्या की, मला त्रास होतो म्हणून मी झोपले हे मी मान्य करते, पण घरात माझी काय चूक आहे हे दाखवून द्या? मी स्वर्गात जाण्यास पात्र आहे आणि किशोरीनं नरकात जावं असं माझं मत आहे. त्यामुळं आता बिग बॉसमधील सदस्य पाप-पुण्याच्या फेऱ्यात अडकणार आहेत.


मनोरा विजयाचा

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये घरातील नवीन कॅप्टन निवडण्यासाठी 'मनोरा विजयाचा' हा टास्क किशोरी आणि शिव ठाकरेमध्ये रंगला. ज्यामध्ये कार्याच्या शेवटी शिवनं या कार्यामध्ये बाजी मारली आणि घराचा नवा कॅप्टन होण्याचा मान पटकावला. आता शिव दुसऱ्यांदा घराचा कॅप्टन बनला असून, त्याच्या कारकिर्दीत घरामध्ये किती शांतता टिकून राहते आणि उद्भवलेली परिस्थिती तो कशी सांभाळतो ते पहायचं आहे.हेही वाचा  -

अभिजीत बिचुकले बिग बाॅसच्या घरात परतणार?

EXCLUSIVE : मेघासोबत बरसणार अनंत अंकुषचा 'पहिला पाऊस'
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा