Advertisement

होळीसाठी रेल्वे पोलीस सज्ज


होळीसाठी रेल्वे पोलीस सज्ज
SHARES

वडाळा - होळी आणि धुलिवंदन सणाच्या पार्श्वभूमीवर हार्बर मार्गावरील वडाळा लोहमार्ग पोलिसांच्या वतीने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी वडाळा रोड आणि गुरु तेग बहादूर स्थानकादरम्यान असलेल्या रावळी केबिन बीपीटी गेट क्रमांक 4 येथील रेल्वे रुळालगतच्या झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाढत्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी रेल्वे प्रवासी, पोलीस मित्रांच्या सहकार्याने बी सेफचा संदेश देण्यासाठी रॅली देखील काढण्यात आली होती.

भारतीय संस्कृतीत होळीला फार महत्त्व आहे. हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करतात. होळी सणात पाण्यांनी अथवा रंगांनी भरलेले फुगे मारू नयेत असे आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत असते. तरीही केवळ मौजमजा म्हणून छुप्या पद्धतीने फुगे उडविण्यात येतात. यामुळे अनेक नागरिक गंभीर जखमी होतात. हा प्रकार रेल्वे लगतच्या झोपडपट्टींमध्ये जास्त प्रमाणात घडत असल्यामुळे यावर आवर घालण्यासाठी वडाळा लोहमार्ग वरिष्ठ पोलीस निरीक्षक आय. बी. सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी स्थानकालगतच्या वस्त्यांमध्ये बैठक घेऊन त्यांच्यामध्ये जनजागृती करण्यात आली. यात चालत्या लोकलवर दगड, पाण्याने किंवा रंगाने भरलेले फुगे मारू नयेत. यामुळे एखादा प्रवासी गंभीर जखमी होऊ शकतो अथवा त्याला प्राणास मुकावे लागेल. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेऊन प्रत्येकाने सहकार्य करा असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा