सदस्यांचं स्वमूल्यांकन अन् बिचुकलेच्या डोळ्यांत पाणी!

बिग बॉस मराठीचा खेळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असल्यानं प्रेक्षकांनाही महाअंतिम फेरीचे वेध लागले आहेत. अशातच या घरातील सदस्य स्वमूल्यांकन करताना दिसणार आहेत.

  • सदस्यांचं स्वमूल्यांकन अन् बिचुकलेच्या डोळ्यांत पाणी!
  • सदस्यांचं स्वमूल्यांकन अन् बिचुकलेच्या डोळ्यांत पाणी!
SHARE

बिग बॉस मराठीचा खेळ आता शेवटच्या टप्प्यात पोहोचला असल्यानं प्रेक्षकांनाही महाअंतिम फेरीचे वेध लागले आहेत. अशातच या घरातील सदस्य स्वमूल्यांकन करताना दिसणार आहेत.


शिवानीची किंमत २ लाख

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता सदस्य स्वत:चं मूल्यांकन ठरवताना दिसणार आहेत. या टास्कमध्ये किशोरी शहाणे, शिव ठाकरे आणि वीणा जगताप यांनी स्वत:चं मूल्यांकन ६ लाख ठरवलं. यावर घरातील सदस्य संमती दर्शवतील की नाही हे आता समजणार आहे. मुद्रांवर सहा लाख, पाच लाख, साडेचार लाख, चार लाख, साडेतीन लाख, दोन लाख अशी किंमत लिहिलेली आहे. शिवानी सुर्वेवर ही संधी येताच तिनं स्वत:ची घरातील किंमत दोन लाख अशी ठरवली. त्यावर तिनं स्पष्टीकरणही दिलं. 


बदल घडवून आणला 

शिवानीचं म्हणणं होतं की, आधी ज्या चुका माझ्याकडून झाल्या त्यासाठी मी ही किंमत ठरवली आहे. कारण जर मी त्या चुका केल्या नसत्या किंवा चुका नाही म्हणणार मी त्याला माझा राग, अॅग्रेशन म्हणेन. मी जर ते कमी केलं असतं तर कदाचित सहा लाख म्हणायला योग्य ठरले असते, पण मला आता ते योग्य वाटत नाही. त्यामुळं मी सगळ्यात कमी किंमत सांगते आहे. मला असं वाटतं की, मी परत आल्यानंतर माझ्या वागणुकीमध्ये योग्य त्या बाबींमध्ये बदल घडवून आणला आहे.


बिचुकले किस्सा सांगणार

बिग बॉसच्या घरात सदस्य स्वमूल्यांकन करताना दिसणार आहेत, तर दुसरीकडं बिचुकलेचे डोळे पाणावल्याचंही प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. बिचुकले आणि त्याचे किस्से खूपच प्रसिध्द आहेत. प्रत्येक घडलेली घटना रंगतदार पध्दतीनं सांगण्याचं कौशल्य बिचुकलेकडं आहे. आता बिचुकले घरामध्ये नेहा, शिवानी आणि आरोहला घडलेला एक मजेदार किस्सा सांगणार आहे. त्याचवेळी अचानक त्याच्या डोळ्यात पाणी का आणि कोणामुळे आलं हे देखील सांगणार आहे. 


पत्नीला पेट्रोल पंपावर विसरला

टेंशनमध्ये असताना आपली पत्नी सोबत असल्याचा बिचुकलेला विसर पडला. बिचुकले पत्नीला पेट्रोल पंपावर विसरून एक किलोमीटर पुढं निघून गेला. पेट्रोल भरण्यासाठी बिचुकले खाली उतरला आणि परतताना मात्र बायकोला विसरून पुढे गेला. याबाबत बिचुकले म्हणाला की, मी खूप टेंशनमध्ये होतो. त्यामुळं मी तिला पेट्रोल पंपावर सोडून पुढे गेलो. हे सांगितल्यावर शिवानी म्हणाली की, हाणला असेल ना तुम्हाला? बिचुकले पुढे म्हणाला की, एक माणूस गाडीतून पुढे आला आणि आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे बघत होता मला कळेच ना काय झालं. परत तसंच घडलं एक जोडप आलं आणि हसून पुढे गेलं. माझ्या ओळखीचे आहेत तरी असे का बघत आहेत हे कळत नव्हतं, म्हणून मी मागं वळून बघितलं तर माझी बायकोच मागं नव्हती. क्षणभर मला काय करावं ते काहीच कळलं नाही. तेव्हा अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं.हेही वाचा  -

क्रिकेट देवतेच्या रूपात सोनम कपूर

'उधाण वारा' घेऊन मराठीकडे वळले सतीश कौशिक
संबंधित विषय
ताज्या बातम्या