Advertisement

पावसानं अडवली मालिकांची वाट!

मुंबईत बरसणाऱ्या संततधार पावसानं जशी सामान्य मुंबईकरांची वाट अडवली आहे, तशीच छोट्या पडद्यावर चमकणाऱ्या ताऱ्यांचाही मार्ग रोखला आहे. त्यामुळं बऱ्याच मालिकांच्या शूटिंगला फटका बसला आहे.

पावसानं अडवली मालिकांची वाट!
SHARES

मुंबईत बरसणाऱ्या संततधार पावसानं जशी सामान्य मुंबईकरांची वाट अडवली आहे, तशीच छोट्या पडद्यावर चमकणाऱ्या ताऱ्यांचाही मार्ग रोखला आहे. त्यामुळं बऱ्याच मालिकांच्या शूटिंगला फटका बसला आहे.

पावसामुळं खीळ

मुंबई, ठाणे, मीरा रोड, नालासोपारा, घोडबंदर रोड, मढ आणि आसपासच्या ठिकाणावर बऱ्याच मालिका, रिअॅलिटी शोज आणि वेबसिरीजचं चित्रीकरण सुरू असतं. अगदी घड्याळाच्या काट्यावर चालणाऱ्या मालिकांच्या शूटिंग शेड्युलला, दोन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळं खीळ बसली आहे. दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच फिल्मसिटीमध्ये बऱ्याच मालिकांचं चित्रीकरण सुरू आहे. या ठिकाणी बऱ्याच मराठी आणि हिंदी मालिकांचे भव्य सेट्स उभारलेले आहेत. यात ऐतिहासिक मालिकांसाठी लागणाऱ्या लवाजम्याचाही समावेश आहे. पावसामुळं कोणत्याही सेटचं नुकसान झाल्याची बातमी नसली तरी, सतत बरसत असलेल्या पावसानं यांच्या टाइम शेड्युलचा खेळखंडोबा केला आहे.

एपिसोडसची बँक

दैनंदिन मालिकांच्या शूटिंगमध्ये खंड पडणं निर्माते आणि वाहिन्यांसाठीही परवडणारं नसतं. त्यामुळंच काही प्रोडक्शन हाऊसेस पावसाचा धोका ओळखून एपिसोडसची बँक तयार करतात, पण जूनच्या अखेरीस आणि जुलैच्या सुरुवातीसच मुंबईमध्ये पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते याची कल्पना नसल्यानं सर्वांची तारांबळ उडाली आहे. फिल्मसिटीमध्ये सखल भागात पाणी साठल्याचं वृत्त असलं, तरी उंच भागात असलेल्या सेटवर शूटिंग सुरू असल्याचं समजतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा सांगणाऱ्या झी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी'सह स्टार प्रवाह वाहिनीवर सुरू झालेल्या 'गुरुदेव दत्त' या मालिकांचं शूटिंग बिनादिक्कत सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

सखल भागांमध्ये पाणी

'बाळूमामाच्या नावानं चांगभलं', 'घाडगे अँड सून', 'माझ्या नवऱ्याची बायको', 'एक घर मंतरलेलं', 'वर्तुळ', 'तू अशी जवळी रहा', 'फुलपाखरू', 'ह.म. बने, तु.म. बने' या मराठी मालिकांना पावसामुळं सुट्टी देण्यात आली आहे. मुंबईतील सखल भागांमध्ये पाणी भरल्यानं कलाकार-तंत्रज्ञ आपल्या ठरलेल्या कॅालटाईमवर पोहोचू शकलेले नाहीत. जे कलाकार तासन् तास प्रवास करून सेटवर पोहोचले, त्यांना सेटवर पाणी भरल्यानं शूट रद्द झाल्याचं समजल्यानं पुन्हा परतीचा त्रासदायक प्रवास करत घर गाठावं लागलं आहे. पावसानं केलेल्या या घोटाळ्यामुळं मालिकेतील कलाकारांना तरी पुढील आठवड्यात जास्त काम करून बॅकलॅाग भरावा लागणार आहे. पर्यायानं याचा परिणाम नाटकांचे प्रयोग आणि चित्रपटांसाठी दिलेल्या तारखांवरही होऊ शकतो.



हेही वाचा -

महापालिका बरखास्त करून टाका- अजित पवार

मुंबईच्या महापौरांना मनसेनं पाठवला जाड भिंगाचा चष्मा



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा