Advertisement

राष्ट्रवादीकडं सोनी टिव्हीचा लेखी माफीनामा


राष्ट्रवादीकडं सोनी टिव्हीचा लेखी माफीनामा
SHARES

सोनीवरील 'कौन बनेगा करोडपती-११' या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला. त्यामुळं नेटकऱ्यांसह अनेकांनी या कार्यक्रमाचे सुत्रसंचालक अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं. तसंच, या कार्यक्रमाविरोधात नाराजी व्यक्त केली. दरम्यान, शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं त्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसनं सोनी टिव्हीच्या मालाड येथीले कार्यालयावर मोर्चा काढला. त्यानंतर, सोनी टिव्हीच्यावतीनं राष्ट्रवादीकडं लेखी माफीनामा देण्यात आला आहे. 

सोनी कार्यालयासमोर निदर्शने

शुक्रवारी दुपारी १२ वाजता मालाड येथील सोनी कार्यालयासमोर निदर्शने करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी परिसरात कोणतोही अनुसुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. 

लेखी माफीनामा

या घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सोनी कार्यालयाबाहेर जमा होताच सोनी टिव्हीच्या व्यवस्थापन विभागानं लेखी माफीनामा राष्ट्रवादीकडं दिला. तसंच, याप्रकरणी माफी मागितली. यावेळी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीनं मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष अॅड. अमोल मातेले, राष्ट्रवादी मुंबई युवक अध्यक्ष अॅड. निलेश भोसले, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्ष अॅड. इंद्रपाल सिंग, उत्तर पश्चिम जिल्हाध्यक्ष अजित रावराणे, कार्याध्यक्षा फेमिदा खान, मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं.



हेही वाचा -

मूडीजचा भारताला झटका, रेटिंग घटवलं

देवेंद्र फडणवीस देणार का मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा ?



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा