Advertisement

मूडीजचा भारताला झटका, रेटिंग घटवलं

क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने आर्थिक आघाडीवर भारताला मोठा झटका दिला आहे. मूडीजने भारताचे रेटिंग (पतदर्जा) घटवले आहे.

मूडीजचा भारताला झटका, रेटिंग घटवलं
SHARES

क्रेडिट रेटिंग एजन्सी मूडीजने आर्थिक आघाडीवर भारताला मोठा झटका दिला आहे. मूडीजने भारताचे रेटिंग (पतदर्जा) घटवले आहे.  मूडीजने भारताचा पतदर्जा स्थिरवरून नकारात्मक कमी केला आहे. आर्थिक विकासाचा वेग मंदावल्याने मूडीजने पतदर्जा नकारात्मक केला आहे. मूडीजच्या मते, भारताची अर्थव्यवस्था सुस्त झाली आहे.  या सुस्त अर्थव्यवस्थेचा धोका वाढत आहे. अशा परिस्थितीत आर्थिक मंदीची चिंता दीर्घकाळ टिकेल. नवीन रोजगार निर्माण होणार नाहीत आणि कर्जही वाढेल.

जागतिक पातळीवर भारतीय अर्थव्यवस्थेच्या नकारात्मक रेटिंगचा थेट परिणाम देशातील परकीय गुंतवणुकीवर होईल. हा भारत सरकारला मोठा झटका ठरू शकेल. कारण पंतप्रधान मोदी हे परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यासाठी सरकारकडून जवळपास प्रत्येक क्षेत्रात एफडीआय मर्यादा वाढवण्यात आली आहे. 

मोदी सरकार २०२५ पर्यंत ५ अब्ज डॉलरच्या अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठण्यासाठी जीडीपी वाढीवर भर देत आहे. पण जगभरातील रेटिंग एजन्सीज भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी करत आहेत. मागील महिन्यात मूडीजने २०१९ -२० या आर्थिक वर्षात विकास दराचा अंदाज घटवून ५.८ टक्के केला आहे. याआधी विकास दर ६.२ टक्के राहण्याचा अंदाज होता. त्याचबरोबर मूडीजने २०२०-२१ या आर्थिक वर्षात ६.६ टक्के वाढीचा अंदाज वर्तविला आहे.


हेही वाचा -

BSNL चे 'इतके' कर्मचारी व्हीआरएससाठी इच्छुक

SBI चं कर्ज झालं स्वस्त, 'इतके' घटवले व्याजदर




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा