सुरेखा पुणेकर का आणि कोणावर झाल्या नाराज?

बिग बॉसच्या घरात हेवेदावे, वादविवाद, भांडणं, हाणामाऱ्या आणि नाराज होण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असतात. आता सुरेखा पुणेकर कोणावर तरी नाराज झाल्या आहेत.

  • सुरेखा पुणेकर का आणि कोणावर झाल्या नाराज?
SHARE

बिग बॉसच्या घरात हेवेदावे, वादविवाद, भांडणं, हाणामाऱ्या आणि नाराज होण्याचे प्रकार सर्रासपणे घडत असतात. आता सुरेखा पुणेकर कोणावर तरी नाराज झाल्या आहेत.

आरोप प्रत्यारोप

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये प्रत्येक सदस्याला कोणती ना कोणती समस्या भेडसावत आहे. इतरांचं वागणं खटकत आहे, भांडण होत आहे, आरोप प्रत्यारोप होत आहेत. कधी कधी या सगळ्या गोष्टी असह्य होतात आणि कोणाकडे तरी मन मोकळं करण्याची इच्छा होते. बऱ्याचदा सदस्य त्यांच्या आवडत्या व्यक्तीकडे या गोष्टी बोलून तर कधी कॅमेरासमोर बोलून मन हलकं करतात. असंच काहीसं सुरेखा पुणेकर यांना वाटू लागलं आहे आणि त्यांनी त्यांचं मन अभिजीत केळकर आणि शिवकडे मोकळ केलं आहे. 

मन मोकळ करावं

त्याच झालं असं की, वीणा आणि शिवला दिलेल्या टास्कमध्ये सुरेखा यांनी त्यांच्यासाठी गाणं म्हटलं, हे गाणं प्रेक्षकांना खूप आवडेल, पण यांची खूप जळायला लागली असून, वीणा आणि त्यांचं आता खूप भांडण होणार, असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर अभिजीत म्हणाला की, आता भांडायचं... तोंडावर सांगायचं जे काही केलं ते. शिवचं देखील हेच म्हणणं आहे की, काय नाटक सुरू आहे? त्यावर सुरेखा म्हणाल्या की, मी मला जे वाटतं ते कॅमेऱ्याला सांगणार होते, पण तुम्हाला बघितलं आणि वाटलं की मन मोकळ करावं, म्हणून मी तुमच्याजवळ आले. 

अश्रू अनावर

सुरेखा यांना शिव आणि अभिजीतबरोबर बोलत असताना अश्रू अनावर झाले. भावनांचा बांध फुटला. मनातील भावना ओठांवर आल्या आणि सुरेखा यांच्या नेत्रांवाटे त्या घळाघळा वाहू लागल्या. खूप वाईट वाटतं आजकलच्या मुली इतक्या हुशार कशा होऊ शकतात? आम्हाला नाही का हुशारी? पण आपण म्हणतो जाऊ दे पोरी आहेत. रात्रीपासून सगळ काम मी केलं, संपूर्ण स्वयंपाक मी बनवला. तांदूळ वाटायचे होते ते पण किशोरीला आले नाही, त्या रुपालीनं करून दिलं. आपण कितीही केलं तरी यांचीच नावं पुढे येणार असं त्या म्हणाल्या.हेही वाचा -

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ः ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, श्रीमंतावरील कराचा बोजा मात्र वाढवला

केंद्रीय अर्थसंकल्पः पेट्रोल, डिझेल, सोने महागणार संबंधित विषय
ताज्या बातम्या