Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्पः पेट्रोल, डिझेल, सोने महागणार

अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल आणि सोन्यावरील करात वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, सोने महागणार आहे. सोने आणि चांदीच्या आयातशुल्कात २ टक्के वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थसंकल्पः पेट्रोल, डिझेल, सोने महागणार
SHARES

अर्थमंत्री  न‍िर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पात पेट्रोल, डिझेल आणि सोन्यावरील करात वाढ केली आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल, सोने महागणार आहे. सोने आणि चांदीच्या आयातशुल्कात २ टक्के वाढ करण्यात आली आहे. तर पेट्रोल आणि डिझेलवर १ रुपये अतिरिक्त कस्टम ड्यूटी आकारण्यात येणार आहे. सोन्यावरील आयात शुल्क आता १२.५ टक्के झाला आहे. हा कर आधी १० टक्के होता. 


काय झालं महाग?

 •  पेट्रोल
 • डिझेल
 • सोने
 • चांदी आणि चांदीचे आभूषण
 • काजू
 • आयात पुस्तके
 • वाहनांचे सुटे भाग
 • सिंथेटिक रबर
 •  पीवीसी
 •  टाइल्‍स
 • तंबाखू उत्पादने
 • ऑप्टिकल फायबर
 • स्‍टेनलेस उत्‍पादन
 • एसी
 • लाउडस्‍पीकर
 •  व्हिडीओ रेकॉर्डर
 • सीसीटीवी कॅमेरा
 • वाहनांचे  हॉर्न
 • सिगारेट 

काय झालं स्वस्त?

 • इलेक्ट्रिक कार
 • गृह कर्ज
 • घर
 •  साबण
 • शॅम्पू
 • टूथपेस्‍ट
 • पंखे, लॅम्‍प, ब्रीफ केस
 • सॅनिटरी वेअर


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा