Advertisement

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ः ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, श्रीमंतावरील कराचा बोजा मात्र वाढवला

घर घेणाऱ्यांनाही मोठा दिलासा या अर्थसंकल्पाने दिला आहे. मध्यमवर्गियांना घर घेणं सोपं होणार आहे.

केंद्रीय अर्थसंकल्प २०१९ः ५ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, श्रीमंतावरील कराचा बोजा मात्र वाढवला
SHARES

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कर रचनेत कसलाच बदल न करता सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला आहे. पाच लाखांवरील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर लागू होणार नाही. कराचे दर जैसे थे ठेवले आहेत. मात्र, श्रीमंतावरील कराचा बोजा वाढवण्यात आला आहे. वार्षिक २ ते ५ कोटी रुपये उत्पन्न असणाऱ्यांवर ३ टक्के सरचार्ज लागणार आहे. तर ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या श्रीमंतांना आता ७ टक्के सरचार्ज द्यावा लागणार आहे. 


घर घेणं सोपं

घर घेणाऱ्यांनाही मोठा दिलासा या अर्थसंकल्पाने दिला आहे. मध्यमवर्गियांना घर घेणं सोपं होणार आहे.  गृहकर्जाच्या व्याजावर मिळणारी सूट २ लाखाहून ३.५ लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे.  ४५ लाख किंमतीचं घर घेतल्यास त्यावरील दीड लाख रुपये व्याज माफ करण्यात येणार आहे. 


२ लाखांचा टीडीएस

एका वर्षात एक कोटींपेक्षा जास्त रक्कम बँकेतून काढल्यास आता २ टक्के टीडीएस द्यावा लागणार आहे. इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी आता पॅन कार्ड अनिवार्य नसेल. फक्त आधार कार्ड असलं तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरता येणार असल्याचं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय 



हेही वाचा -

केंद्रीय अर्थसंकल्पः पेट्रोल, डिझेल, सोने महागणार

केंद्रीय अर्थसंकल्पामधील ठळक मुद्दे




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा