वनिता समाज गौरव पुरस्कार

 Dadar
वनिता समाज गौरव पुरस्कार
वनिता समाज गौरव पुरस्कार
See all

दादर - वनिता समाज हॉलमध्ये वनिता समाज गौरव पुरस्काचे आयोजन करण्यात आले होते. यंदा गौरव पुरस्कार नाशिकच्या दिलासा केअर केंद्राच्या संचालिका उज्वला जगताप यांना प्रदान करण्यात आला. मानपत्र, मानचिन्ह आणि 25 हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप होते. समाज सेवेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार वनिता समाजाच्या वतीने प्रदान करण्यात येतो.

वनिता समाजाच्या 'कौमुदिनी' या वार्षिक हस्त लिखिताचे प्रकाशन मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. या हस्त लिखितात उत्कृष्ट लेखन करणाऱ्या 5 महिलांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. समाजसेवेचे काम करणाऱ्या निवडक अशा महिलांचा श्रीफळ आणि पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

'स्त्री'चा संयम हीच तिची मुख्य ताकद असते. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये सहनशीलता अधिक असते. त्यामुळेच त्या एकावेळी दोन्ही कुटुंबाना आनंद देऊ शकतात, अशा भावना स्नेहलता देशमुख यांनी यावेळी व्यक्त केल्या.

Loading Comments