डबेवाल्यांची " माणुसकीची भिंत"

 Lower Parel
डबेवाल्यांची " माणुसकीची भिंत"
डबेवाल्यांची " माणुसकीची भिंत"
See all

लोअर परळ - लोअर परळ येथील डबेवाल्यांनी माणुसकीची भिंत या संकल्पनेची सुरुवात केली आहे. फुटपाथवर झोपणाऱ्यांसाठी ही संकल्पना राबवण्यात आली. डबेवाले संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संकल्पना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर या संकल्पनेला यश मिळाले तर मुंबईतील प्रमुख लोकलच्या स्थानकाबाहेर डबेवाल्यांची " माणुसकीची भिंत" ही संकल्पना राबवण्यात येईल असं ही त्यांनी या वेळी सांगितले. माणुसकीची भिंत या संकल्पनेत घरातील थंडीपासून बचाव करण्यासाठी वापरण्यात येणारं

ब्लॅन्केट,रजई, वुलनचे कपडे, मफलर, स्वेटर या वस्तूंना स्वच्छ धुवून त्यांना ईस्त्री करून त्यांची व्यवस्थीत घडी घालून त्या माणुसकीच्या भिंती जवळ आणुन ठेवावीत. ज्या गरीबाला ती आवश्यक आहेत त्या गरीबाने तेथे येऊन ती घेऊन जावीत. जालिंदर करवंदे आणि रोहीदास सावंत या डबेवाल्यांनी पुढाकार घेऊन लोअर परळ येथील पुलावर माणुसकीची भिंत संकल्पना राबवण्याचा निर्णय घेतला.

Loading Comments