Advertisement

कोण कोणाला देणार धोबीपछाड?

बिग बॉस दर आठवड्याला घरातील सदस्यांना एक साप्ताहिक कार्य देतात. हे कार्य पार पाडण्यासाठी घरातील सदस्य जितके आतुरलेले असतात, तितकेच यात कोण विजयी ठरतं हे पाहण्याची प्रेक्षकही वाट पहात असतात.

कोण कोणाला देणार धोबीपछाड?
SHARES

बिग बॉस दर आठवड्याला घरातील सदस्यांना एक साप्ताहिक कार्य देतात. हे कार्य पार पाडण्यासाठी घरातील सदस्य जितके आतुरलेले असतात, तितकेच यात कोण विजयी ठरतं हे पाहण्याची प्रेक्षकही वाट पहात असतात. त्यामुळं आता या आठवड्यात कोण कोणाला धोबीपछाड देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


एक डाव धोबीपछाड

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य सुरु आहे. ज्यामध्ये सदस्य पूर्णपणे साम, दाम, दंड, भेद यांचा चातुर्यानं उपयोग करून टास्क जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. काल या टास्कमध्ये विणाची टीम विजेती ठरली. विणाच्या टीमने चातुर्यानं काल या टास्कमध्ये विजय मिळवला. आज देखील विणा आणि पराग मॅनेजर असून, आज हे दोघे कुठल्या योजना आखून टास्क जिंकतात हे पहाणं रंजक ठरणार आहे. 


इस्त्री चोरली

आतापर्यंत नेहा, पराग विरुद्ध शिव अशी खडाजंगी बघयला मिळाली होती, ज्यामध्ये नंतर परागची तब्बेतदेखील थोडी बिघडली. यामध्येच शिवनं विरोधी टीमची  इस्त्री चोरली. आता टास्क जिंकण्यासाठी दोन्ही टीममध्ये चुरस बघायला मिळणार आहे. आज दोन्ही टीम बळाचा वापर करताना दिसणार आहेत. ज्यामुळेच संचालिकेनं म्हणजेच वैशालीनं, 'मी दोन्ही टीमला डिस्क्वालिफाय करत आहे', असं जाहीर केलं. आता हे साप्ताहिक कार्य कसे पुढे जाणार? हे पहायचं आहे. यासोबतच सगळे सदस्य मिळून अभिजीत बिचुकले यांना पाण्यामध्ये टाकणार आहेत.हेही वाचा -

… आणि प्रियांकासाठी आकाशही झालं गुलाबी

क्रितीचा 'पटियाला' अंदाज पाहिला का?
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा