Advertisement

बिग बॉसने 'सात बारा' का थांबवला?

टास्कमध्ये असं काहीतरी घडली कि बिग बॉस यांनी हे कार्य याच ठिकाणी थांबवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळं बिग बॉसनं 'सात बारा' का थांबवला ते आता पहायला मिळणार आहे.

बिग बॉसने 'सात बारा' का थांबवला?
SHARES

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नुकतंच नॉमिनेशन कार्य पार पडलं. ज्यामध्ये पहिल्याच फेरीमध्ये हीना नॉमिनेट झाली. मग, विणा जगताप... नियमांचं उल्लंघन केल्यानं किशोरी शहाणे आणि माधव देवचके आणि नेहा शितोळे... वाईल्ड कार्ड एन्ट्री असल्यानं आरोह वेलणकर आणि घराची कॅप्टन असल्यानं शिवानी सुर्वे या नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित राहिले. 


सात बारा साप्ताहिक कार्य

या कार्यादरम्यान नेहा आणि शिवानीमध्ये बरीच बाचाबाची झाली. घरामध्ये 'सात बारा' हे साप्ताहिक कार्य पार पडत आहे. टीम ए आणि टीम बी अशा दोन टीम्समध्ये हे कार्य पार पडेल. अभिजीत, विणा, हीना, आरोह आणि किशोरी एका टीममध्ये, तर शिवानी, नेहा, रुपाली, शिव आणि माधव दुसऱ्या टीममध्ये असणार आहेत. आता बघूया या कार्यामध्ये कोण बाजी मारणार? आणि कोणती टीम हरणार? हे पहायचं असलं तरी टास्कमध्ये असं काहीतरी घडली कि बिग बॉस यांनी हे कार्य याच ठिकाणी थांबवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळं बिग बॉसनं 'सात बारा' का थांबवला ते आता पहायला मिळणार आहे.


बांबू हातामध्ये घ्या

या दरम्यान प्रत्येक टीम आपापली योजना आखताना दिसणार आहे. ज्यामध्ये माधवचं म्हणणे आहे की, मला आवडेल, पण मुकादमच्या अजून काय काय गोष्टी आहेत त्या मला सांगा नाहीतर असं नको व्हायला मी तिकडे जास्तच काही केलं. अभिजीतचं त्याच्या टीमला सांगणं आहे की, जे कीटक आहेत त्यांनी आता कसेही जा. आपण आधी पलीकडे जायचं आणि तिथून सुरु करायचं. विणाचं म्हणणं आहे की, ते काढा आणि फेका मुकादम पकडेल ते. नेहाचं तिच्या टीमला म्हणणं आहे की, सगळे मधले बांबू आधी हातामध्ये घ्या, त्यांना बांबू मिळू देऊ नका.


हीना-शिवमध्ये वाद 

टास्क सुरु झाल्यावर किशोरी यांना खारूताई असं सदस्य म्हणू लागले, तर हीना आणि शिवमध्ये पुन्हा एकदा वाद विवाद सुरु झाला. हीना शिवच्या अंगावर येत होती आणि तिचं म्हणणं होतं की, बळाचा वापर करू नकोस. त्यावर शिव म्हणाला की, तू अंगावर येत आहेस माझ्या, मला डोक्यानं हलका समजतेस का? शिवानीचं म्हणणं होतं की, ती मुद्दाम येत आहे. अभिजीत माधवला ढकलतो आहे. त्यावर अभिजीतचं म्हणणं होतं की, ढकलणारच ना... शिवानीचं यावर म्हणणं होतं की, दादा काय बोलला ऐकलंस का? शिव ढकल तू पण... त्यावर अभिजीत म्हणाला की, ती मुद्दाम बोलत आहे शिव... शिवचं यावर सगळ्यांनाच म्हणणं होतं की, मला गेम समजतो सगळे शांत बसा. त्यामुळं पुढं काय घडतं ते पहायला मजा येणार आहे.हेही वाचा -

'टकाटक'ची सक्सेस पार्टी! नक्की बघा, कोण काय म्हणालं

थिएटरमध्ये जाऊन बघा ‘उरी’ सिनेमाचा मोफत शो, ‘कारगिल विजय दिनी’ सरकारचं गिफ्ट
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा