Advertisement

महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान मुलींचा सत्कार


महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान मुलींचा सत्कार
SHARES

दादर - 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर कर्तृत्ववान मुलींचा सन्मान सोहळा किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंदमध्ये घेण्यात आला. या कार्यक्रमात उत्तुंग कामगिरी केलेल्या देशातील 6 मुलींचा सत्कार षण्मुखानंद कमिटीचे अध्यक्ष डॉ. वि.शंकर यांच्या हस्ते करण्यात आला. 50 हजार रोख रक्कम, ट्रॉफी आणि लॅपटॉप देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

दहा वर्षांच्या रीदा झेहर या चिमुकलीला भगवत गीतेतील अठरा अध्याय अगदी तोंड पाठ आहेत. तर, आठ वर्षांची श्रीनगर येथे राहणारी ताजमुल इस्लाम सर्वात कमी वयाची जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन आहे. सुषमा वर्मा हिने वयाच्या 17 व्या वर्षी एमएससी पूर्ण केलं. तसंच आता ती पीएचडी करतेय. तर, सुषमाची 5 वर्षांची छोटी बहीण अनन्या वर्मा हिला चक्क रामायण पाठ आहे. मालावत पूर्णा हिने वयाच्या तेराव्या वर्षी माउंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वात उंच शिखर सर केलं आहे. मुंबईच्या एका रिक्षाचालकाची मुलगी प्रेमा जयकुमार ही सीए टॉपर आहे. अश्या भारतातील प्रेरणादायी आणि अत्यंत कमी वयात इतकी अनोखी कामगिरी करणाऱ्या मुलींना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आलं. त्याचवेळी महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त चौरंग प्रस्तुत ‘माय मराठीच्या लेकी’ हा स्त्री शक्तीची जाणीव करून देणारा संगीतमय कार्यक्रम येथे सादर करण्यात आला.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा