बाप्पा ‘वेटिंग’वर...

 Mumbai
बाप्पा ‘वेटिंग’वर...

बाप्पाच्या आगमनाची तयारी करण्यासाठी शहरातील हजारो गणेशोत्सव मंडळे दीड-दोन महिन्यांपासूनच गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहेत. पण आत्तापर्यंत केवळ 291 मंडळांनाच मंडप उभारणीची परवानगी मिळालीय. 1 हजार 300 हून अधिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठीची मुंबई महानगर पालिकेची परवानगी मिळालेली नाही.

रस्त्यावर मंडप टाकण्यासाठी पालिकेच्या वॉर्ड कार्यालयांकडे आणि पोलिसांकडे 1 हजार 947 मंडळांनी अर्ज केले होते. यातील केवळ 291 मंडळांनाच परवानगी देण्यात आलीय. तर 308 मंडळांचे अर्ज बाद करण्यात आलेत. उर्वरित अर्जांची छाननी करत परवानगी देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं पालिका प्रशासनाकडू स्पष्ट करण्यात आलंय. पोलिसांकडेच दीड हजारांहून अधिक मंडळांच्या परवानग्या लटकल्यात. येत्या पाच दिवसांत परवानगीचा प्रश्न निकाली काढण्याचे आव्हान पालिका आणि पोलिसांसमोर आहे.

 

खालील वॉर्डमध्ये सर्वाधिक परवानग्या लटकल्या

             वॉर्ड

      पोलीस परवानगी

    बीएमसी  परवानगी

      के / पूर्व

१६३

      एम /पूर्व

१०५

 ५२

      एम / पश्चिम

७४

१८

      जी / दक्षिण

६८

२०

      जी / उत्तर

५७

 ३०

       पी / उत्तर

 ५५

११

       डी

५५

०३

 

Loading Comments