अंधेरी - चांदिवलीl गुरुवारपासून आई महोत्सवाला सुरुवात झालीये. या वेळी शुक्रवारी सायंकाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकरांच प्रवचन झालं. बाबा महाराज सातारकरांच्या प्रवचनात चांदिवलीकर तल्लीन झाले होते. बाबा महाराजांनी आईची महती आपल्या प्रवचनातून सांगितली. हुतात्मा कॅप्टन विनायक गोरे यांच्या वीरमाता अनुराधा गोरे यांनी सियाचीनमध्ये भारतीय जवान कसे जगतात, यावर प्रकाशझोत टाकला. तसंच सियाचीनचा इतिहास आणि भारताच्या स्वातंत्र्यपूर्वीच्याही गोष्टी सांगितल्या. आई महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना उपनेते आदेश बांदेकर, आमदार संजय पोतनीस यांचीही उपस्थिती होती.