गोवंडीत अखंड हरिनाम सप्ताह

 Govandi
गोवंडीत अखंड हरिनाम सप्ताह

गोवंडी - संत शिरोमणी तुकाराम महाराज मंदिर, बोरबादेवी,गोवंडी यांच्यातर्फे 10 मार्च ते 16 मार्च या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं आहे. या हरिनाम सप्ताहात स्थानिकांसह विविध विभागातील किर्तनकार सामिल झाले. गंगापुजन, मूर्तीस अभिषेक, ज्ञानेश्वरी पारायण, काकड आरती हरिपाठ अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 ते रात्रौ 12 पर्यंत या कार्यक्रमांची वेळ असून, त्यानंतर जागर आणि भजनाचा कार्यक्रम होतो. दरवर्षी याठिकणी अशा प्रकारे सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यंदाही भाविकांनी किर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन बोरबादेवी मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Loading Comments