हिंदू नववर्ष स्वागत समितीची गुढी

 Dadar
हिंदू नववर्ष स्वागत समितीची गुढी
हिंदू नववर्ष स्वागत समितीची गुढी
See all
Dadar , Mumbai  -  

दादर - दादरमध्ये पारंपारिक वाद्यांच्या गजरात हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शिवसेना भवनसमोर राम गणेश गडकरी चौकात भव्य गुढी उभारण्यात आली आहे. यावेळी कोहिनूर स्क्वेअरचा पद्पथ आणि गडकरी चौक समोरील सर्व परिसर फुलांच्या माळांनी सुशोभित करण्यात आला होता. सुशोभिकरणात लोकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला तो या ठिकाणी तयार करण्यात आलेला 15 फुटांचा भव्य असा इको फ्रेंडली सेट. हिंदू संस्कृतीचे दर्शन घडवणारा हा भव्य 15 फुटांचा इको फ्रेंडली सेट सालाबादाप्रमाणे यंदाही कलाकार सुरेशचंद्र तारकर यांनी तयार केला होता. हिंदू नववर्ष स्वागत समितीच्यावतीने दादर- माहिम- प्रभादेवी परीसरात गुढीपाढव्यामुळे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाजपाचे मुंबई अध्यक्ष अशिष शेलार आणि राज्यगृहमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. गुढी उभारल्यानंतर प्रभादेवी मंदिरापासून दादरपर्यंत शोभायात्रा काढण्यात आली.

Loading Comments