Advertisement

गणेशोत्सवात बाहुबली ठरला मोदींना भारी!


गणेशोत्सवात बाहुबली ठरला मोदींना भारी!
SHARES

देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीच चर्चा सुरू आहे. पण तेवढीच चर्चा बाहुबलीच्या नावाचीही आहे. नरेंद्र मोदी यांना कोणी हिटलर म्हणतं तर कोणी बाहुबली! परंतु प्रत्यक्षात गणेशमूर्तीच्या रुपात कोणी नरेंद्र मोदी यांची पूजा करायला तयार नाही. मात्र, बाहुबलीच्या रुपातली गणेश मूर्ती भक्तांना पसंत पडू लागली आहे. त्यामुळे गणेशोत्सवात का होईना, नरेंद मोंदींना बाहुबली भारी पडल्याचे दिसून येते.

गणेशोत्सवासाठी गणेशमूर्ती आणण्याची प्रत्येकाचीच लगबग असते. काही आधीच आपल्या मूर्तिकारांकडे गणेशमूर्तीची नोंदणी करतात, तर काही जण नोंदणी न करता थेट खरेदीच करतात. मात्र दरवर्षीपेक्षा यंदा गणेश मूर्तींमध्ये दोन नवीन कलाकृतीच्या गणेश मूर्ती बाजारात दिसून आल्या. यामध्ये एक आहेत मोदी गणेश आणि दुसरी मूर्ती आहे बाहुबली गणेश. परंतु, यापैकी कार्यशाळांमध्ये बाहुबली गणेश मूर्तींनाच जास्त मागणी असल्याचं चित्र दिसून आलं.



लालबागचा राजा, मयुररथलाही मागणी

लालबाग-काळाचौकी येथील कार्यशाळांमध्ये दरवर्षीच्या विविध कलाकृतींच्या, तसेच विविध संकल्पनांच्या गणेशमूर्ती आहेत. या सर्व मूर्तींना दरवर्षीप्रमाणेच प्रतिसाद होता. लालबागचा राजा, मयुररथ या मूर्तींना जास्त मागणी होती. पण त्याचबरोबर बाहुबली गणेशमूर्तीलाही मागणी चांगलीच मागणी दिसून आली. सध्या मोदी गणपती आणि बाहुबली गणपतीच्या मूर्ती बाजारात नवीन आहेत. परंतु यामध्ये बाहुबली गणपतीला जास्त पसंती मिळाल्याची माहिती काळाचौकीतील वक्रतुंड आर्ट्सचे विनित ठाकूर यांनी दिली आहे. मोदी गणपतीच्या ३ मूर्ती आणि बाहुबलीच्या ३ मूर्ती आम्ही ठेवल्या होत्या. परंतु, मोदी रुपातील गणेश मूर्तीपैकी एकही मूर्ती कोणी घेतलेली नाही. त्या तुलनेत २ बाहुबली गणपती मूर्तींची नोंदणी झाल्याचे ठाकूर यांनी सांगितले.


नोंदणी करणाऱ्यांना मूर्ती पडते महाग

अनेक भक्तांकडून गणेशमूर्तींची नोंदणी ही आधीच केली जाते. त्यामुळे मूर्तींची निश्चित केलेली रक्कम भक्तांना देणे बंधनकारक असते. परंतु, नोंदणी केलेल्या मूर्तीपेक्षा शेवटच्या दिवशी गणेशमूर्तीची किंमत ही कमी असते, असेही विनित ठाकूर यांनी सांगितले आहे. शेवटच्या दिवसापर्यंत मूर्ती विकल्या न गेल्यास त्या सांभाळून ठेवण्यापेक्षा किंमत कमी करून विकल्या जातात, असेही ते म्हणाले.



हेही वाचा

जिथे असाल तिथे! मुंबईतील फेमस मंडळांच्या गणेश आरती पहा लाइव्ह!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा