Advertisement

चिंचपोकळीचा चिंतामणी 'महिष्मती'च्या दरबारात


SHARES

'चिंचपोकळीचा चिंतामणी' नावाने प्रसिद्ध असलेला चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचा गणपती यंदा 'बाहुबली' सिनेमातील 'महिष्मती'च्या दरबारात विराजमान झाला आहे.

गिरणगावातील सर्वात जुना गणपती म्हणून या गणरायाची ख्याती असल्याने या गणरायाचे दर्शन घेण्यासाठी अकरा दिवसांमध्ये मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात. यंदा ढोल, ताशांच्या गजरात या गणेशाची पहिली झलक मंडळातर्फे भाविकांना दाखवण्यात आली.



१८ फूट उंच मूर्ती

यंदाची गणेशमूर्ती १८ फूट उंचीची असून प्रसिद्ध मूर्तीकार दि. विजय खातू यांनी ही मूर्ती साकारली आहे. तर देखावा अमन विधाते यांनी तयार केला आहे. यावर्षीच्या देखाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे बाहुबली चित्रपटात दाखवल्याप्रमाणे 'महिष्मती' साम्राज्यातील दरबार उभारण्यात आला आहे. या दरबारात 'चिंचपोकळीचा चिंतामणी' मोठ्या दिमाखात विराजमान झाला आहे.



सामाजिक कामे

गणेशोत्सव साजरा करतानाच चिंचपोकळी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळातर्फे सामाजिक आणि क्रीडा कार्यक्रमही राबवले जातात. खेडेगावात जाऊन आरोग्य शिबीर, मोफत औषधाचे वाटप केले जाते. आदिवासी पाड्यात जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात मंडळाचे सदस्य नेहमीच पुढाकार घेतात.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा