Advertisement

होळीसाठी वृक्षतोड करू नका, ‘अन्यथा…’

होळी उभारण्यासाठी सर्वप्रथम लाकडं गोळा केली जातात. यासाठी अनेक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. मात्र यंदा वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

होळीसाठी वृक्षतोड करू नका, ‘अन्यथा…’
SHARES

होळी अवघ्या २ दिवसांवर येऊन ठेपली असून, सर्वत्र होळीच्या तयारीला सुरूवात झाली आहे. होळी तयार करण्यासाठी लाकडं, सुख गवत शेणाच्या गोवऱ्या गोळा करण्यास सुरूवात झाली आहे. परंतू, होळी उभारण्यासाठी सर्वप्रथम लाकडं गोळा केली जातात. यासाठी अनेक ठिकाणी वृक्षतोड केली जाते. मात्र यंदा वृक्षतोडीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसंच, वृक्षतोड केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

होळीसाठी झाड तोडू नये, असे आवाहन महापालिका प्रशासनानं केलं असून, झाड तोडणाऱ्याकडून १ ते ५ हजारांचा दंड वसूल करण्यात येणार आहे. तसंच, एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते. त्यामुळं होळीसाठी वृक्षतोड करू नये, असं आव्हान महापालिकेनं केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पर्यावरण रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, 1975 अंतर्गत कोणतेही झाड पूर्वपरवानगीशिवाय तोडणे कलम 21 नुसार अपराध ठरतो.

या बेकायदेशीर वृक्षतोडीसाठी १ ते ५ हजारांचा दंड आकारला जातो. शिवाय एक आठवडा ते एक वर्षापर्यंत कैदेची शिक्षाही होऊ शकते, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली. त्यामुळं येत्या १७ मार्च रोजी होणाऱ्या होळीसाठी वृक्षतोड केल्याचे निदर्शनास आल्यास पोलिसांत तक्रार केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा