बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच! - हायकोर्ट

गणेश विसर्जनादरम्यान डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या पाला संघटनेच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत डॉल्बी आणि डीजेवरची बंदी कायम ठेवली आहे. आता यावर अंतिमि सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे.

  • बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत डीजेचा दणदणाट नाहीच! - हायकोर्ट
SHARE

बाप्पाच्या आगनमाप्रमाणेच विसर्जनाच्या वेळीही भक्तमंडळी ढोल, ताशांच्या गजराबरोबरच डीजे आणि डॉल्बीच्या तालावर बेधुंद होऊन नाचतात. मात्र यंदा गणेश विसर्जनादरम्यान डॉल्बी आणि डीजेचा दणदणाट वाजणार नाही. कारण ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने यंदा विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी आणि डीजेवर बंदी घातली आहे.


अंतिम सुनावणी कधी? 

गणेश विसर्जनादरम्यान डीजे बंदीला आव्हान देणाऱ्या पाला संघटनेच्या याचिकेवर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळत डॉल्बी आणि डीजेवरची बंदी कायम ठेवली आहे. आता यावर अंतिम सुनावणी 4 आठवड्यांनी होणार आहे.


सरकारनेही सकारात्मकता दर्शवली

यापूर्वी तांत्रिक कारणामुळे याप्रकणावरील सुनावणी १९ सप्टेंबरपर्यंत तहकूब करण्यात आली होती. दरम्यान या सुनावणीत सण येत जात राहतील, पण उत्सवातील गोंगाटाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तसंच डीजे या साऊंड सिस्टिमच्या वापरावर सरसकट बंदी घालणं किती योग्य आहे? असा सवाल करत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर राज्य सरकारनेही गणेश विसर्जनादरम्यान डीजे वाजवण्यास घातलेल्या बंदीला सकारात्मकता दर्शवली होती.


हेही वाचा -

सरकारही डीजेच्या विरोधात, न्यायालयानं निकाल ठेवला राखून

संबंधित विषय
ताज्या बातम्या