Advertisement

दादर फुल बाजारात झेंडूने खाल्ला भाव


दादर फुल बाजारात झेंडूने खाल्ला भाव
SHARES

साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे दसरा. दसऱ्याच्या आदल्या दिवशी फुल खरेदीसाठी दादर फुलबाजारात दरवर्षी गर्दी होते. त्यानुसार यंदाही दादरच्या बाजारात झेंडू मोठ्या प्रमाणात दाखल झाला असून झेंडूचा भावही गेल्या वर्षीच्या तुलनेत चढाच आहे. असे असले, तरी ग्राहकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही.



शुक्रवारी झेंडूची फुले, तोरण, आपट्याची पाने, आंब्याची पाने खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. यावर्षी किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव १०० ते १२० रूपयांपर्यंत पोहचला आहे. तर झेंडूच्या एका तोरणाची किंमत ४० ते ५० रूपये एवढी आहे.



गेल्यावर्षी ८० रूपये किलो दराने झेंडूची विक्री झाली होती. सणासुदीचे निमित्त वगळता सरासरी ४० रूपये किलो या दराने झेंडूची विक्री होते. मात्र नवरात्रचे ९ दिवस आणि दसऱ्या निमित्त झेंडूचे दर मागील पंधरा दिवसांपासून चढेच आहेत. तर आपट्याच्या एका जुडीची किंमत १० रूपये आहे.


फुलांची किंमत कितीही असली, तरी दसऱ्या निमित्त फुले ही लागतातच. त्यामुळे मिळेल त्या भावाला फुले खरेदी करावी लागत आहेत. यावर्षी दर खूपच जास्त आहे. दिवसेंदिवस फुलांच्या किंमतीही वाढत चालल्या आहेत.
- प्रांजली शिंदे, ग्राहक



सध्या फुलांचा भाव वधारला आहे. मार्केटमधून फुले किरकोळ बाजारात आणणे, वाहतूक खर्च मिळून फुलांचा भाव वाढला आहे. त्यामुळे गिऱ्हाईक कमी झाले आहेत. यावर्षी म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी विक्री झाली.
- गणेश, फुल विक्रेता



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा