वरळीत शिवजयंती साजरी


  • वरळीत शिवजयंती साजरी
  • वरळीत शिवजयंती साजरी
SHARE

वरळी - शिवनेरी कट्टा या बालगोपाळांच्या मंडळाकडून बुधवारी वरळीतल्या गोपाळनगरच्या महालक्ष्मी हाऊसिंग सोसायटीत शिवजयंती साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम साजरे करण्यात आले. परंतु या ठिकाणी मात्र शिवजयंती निमित्त सत्यनारायण पूजा आयोजित केली होती. त्याच बरोबर वरळीतल्या प्रसिद्ध भजन मंडळ असलेल्या साई इच्छा भजन मंडळाचे भजन देखील आयोजित केले होते. या वेळी शिवजयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला बच्चे कंपनीसह रहिवासीही सहभागी झाले होते.

ही शिवजयंती वरळीच्या शिवनेरी कट्टा या मंडळाकडून साजरी केली गेली. शिवनेरी कट्टा ग्रुप दरवर्षी शिवजयंती वेगवेगळ्या पद्धतीने साजरी करतात. यंदा पोवाडे आणि पारंपरिक पद्धती बरोबरच सायंकाळी डिजेचा गोंधळ करण्याऐवजी या वेळी भजनाचे आयोजन करण्यात आले होते. दरवर्षी मंडळाचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यवाहक विनायक भास्कर मिठबावकर हे बच्चे कंपनीसाठी शिवजयंतीची नवीन थीम ठरवतात. त्याप्रमाणे त्यांनी यंदाही या ठिकाणी अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली.

संबंधित विषय
ताज्या बातम्या