Advertisement

कोरोनाचं दहिहंडी उत्सवावर सावट, 'या' आयोजकांनी स्पर्धा केली रद्द


कोरोनाचं दहिहंडी उत्सवावर सावट, 'या' आयोजकांनी स्पर्धा केली रद्द
SHARES

कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग खूप बंधनकारक आहे. गर्दी टाळण्याचं आवाहन वारंवार राज्य आणि केंद्र सरकारकडून केलं जात आहे. परिणामी या कोरोनाचा फटका सणांना बसला आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून या कोरोनाचं आलेलं संकट लक्षात घेता गणेशोत्सवा पाठोपाठच दहीहंडी उत्सव रद्द होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं संस्कृती युवा प्रतिष्ठानची प्रसिध्द दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दहीहंडी पथकाचे अध्यक्ष, आमदार प्रताप सरनाईक आणि सचिव तसेच संयोजक पूर्वेश सरनाईक यांनी याबाबतची माहिती दिली.

मुंबईमध्ये प्रो गोविंदा ही संकल्पना संस्कृती युवा प्रतिष्ठाननं आणली. या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन तरुण पुढे येत असून हंडीत तब्बल ९ थरांचा जागतिक विक्रम झाला त्याची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवली गेली आहे. त्यामुळं दरवर्षी संस्कृती युवा प्रतिष्ठानची दहीहंडी अतिशय उत्साहात साजरी होते. मात्र, यंदा कोरोनामुळं हा सण साजरा करणं शक्य होणार नाही. दहीहंडी उत्सव पाहणाऱ्यांची संख्याही मोठी असते. त्यामुळं या सणाच्या दिवशी सोशल डिस्टन्सिंगसह विविध नियमांचं पालन होणार नाही. सोशल डिस्टन्सिंग ठेवणं गरजेचं आहे.

काही दिवसांपूर्वीच सरकारचा निर्णय येण्याआधी भाजप नेते राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईसह राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत चालला आहे. मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. या नियमांचं पालन व्हावं यासाठी दहीहंडीला होणारी मोठी गर्दी पाहता त्यांनी हा निर्णय जाहीर केला. यंदा सार्वजनिक गणेशोत्सव अतिशय साधेपणानं साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. यंदा आपल्यापुढं कोरोनाचं मोठं संकट आहे.



हेही वाचा -

‘इस्रो सायबरस्पेस’ घरी बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा

कोरोना मृतांमध्ये ५० वर्षांवरील सर्वाधिक रुग्ण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा