Advertisement

दादरचं फूल मार्केट गजबजलं

बुधवारी झेंडूची फूलं, तोरण, आपट्याची पानं, आंब्याची पानं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर्षी किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव १२० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला असून एका झेंडूच्या तोरणाची किंमत ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे.

दादरचं फूल मार्केट गजबजलं
SHARES

सगळ्या सणांमध्ये ‘मोठा सण’ म्हणून मानल्या जाणाऱ्या दसऱ्याची तयारी मुंबईकर सध्या जोरात करत आहेत. साडेतीन मुहूर्तापकी एक असलेल्या या मुहूर्तासाठी फुलांची आणि तोरणांची खरेदी करण्यासाठी दादरच्या फूल मार्केटमध्ये ग्राहकांनी एकच गर्दी केली आहे. दसऱ्यासाठी राखून ठेवलेल्या पिवळ्या केशरी रंगाची फूलं मुंबईच्या बाजारात दाखल झाली असून यंदाच्या वर्षीही फुलांचे भाव जास्त असल्याचं दिसून येत आहेत. 



४०० ते ५०० ट्रक दाखल 

खास दसऱ्यासाठी झेंडूच्या फुलांनी भरलेले जवळपास ४०० ते ५०० ट्रक मुंबईत दाखल झाले आहेत. दसऱ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नामदारी, पिवळे, कोलकत्ता यांसारख्या वेगवेगळ्या गोंड्याची फुलांची लोक खरेदी करताना दिसत आहेत. दरवर्षीप्रमाणं यंदाही दादरच्या बाजारात झेंडू मोठ्या प्रमाणात दाखल झाली असून गेल्या वर्षीच्या तुलनेत भावही चांगलेच वधारले आहेत.


भाव वधारले

बुधवारी झेंडूची फूलं, तोरण, आपट्याची पानं, आंब्याची पानं खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावर्षी किरकोळ विक्रीत झेंडूचा भाव १२० ते १५० रुपयांपर्यंत पोहोचला असून एका झेंडूच्या तोरणाची किंमत ५० ते ६० रुपयांपर्यंत आहे. सणासुदीच्या दिवसांव्यतिरिक्त सरासरी ५० रुपये किलो दरानं झेंडूची विक्री होते. मात्र गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी यांंसारख्या सणाला सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर फुलांचे भाव चांगलेच वधारले अाहेत. शिवाय आपट्याच्या पानाच्या एका जुडीची किंमत १० ते १५ रुपये इतकी आहे.


वेबसाईट, मॉल्समध्ये सवलती

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोनं, टिव्ही, कपडे, स्मार्टफोन तसंच अन्य इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांत वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. दसऱ्याच्या निमित्तानं विविध कंपनी, वेबसाईट, मॉल्समध्येही सवलती व काही भेटवस्तूंचं गाजर दाखवल जात असल्यानं ग्राहकवर्ग याठिकाणी आकर्षित होत आहे. दसरा हा सोने खरेदीसाठी चांगला मुहूर्त मानला जात सध्या सोन्याचा भाव प्रतितोळा ३४ हजार ६०० रुपये इतका आहे. दरम्यान दसऱ्यानंतर लगेचच दिवाळी येत असल्यानं सोन्याचे भाव अजून वाढणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. 



हेही वाचा - 

दांडीयामध्ये रमले छोट्या पडद्यावरील कलाकार




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा