Advertisement

यंदाच्या गणेशोत्सवात दरवळणार 'या' अगरबत्त्यांचा सुगंध!


यंदाच्या गणेशोत्सवात दरवळणार 'या' अगरबत्त्यांचा सुगंध!
SHARES

कोणतेही धार्मिक कार्य असो किंवा पूजा, सुवासिक अगरबत्ती दरवळल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. धार्मिक विधीमध्ये पूजेच्या वेळी फुलांबरोबर अगरबत्ती लावण्यालाही महत्त्व आहे. गणेशोत्सवानिमित्त दादर, माटुंगा, लालबाग, परळ आणि मस्जिद बंदर इथल्या बाजारात या व्यवसायाची मोठी उलाढाल होते. घरगुती गणपतींसोबतच सार्वजनिक गणेश मंडपातही पूजा आणि आरतीच्या वेळी अगरबत्तीचा वापर केला जातो. घरगुती बाप्पांबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना देखील दीर्घकाळ चालणाऱ्या अगरबत्त्यांना चांगली मागणी असते.



अगरबत्तीचे दोन प्रकार

१) मसाला अगरबत्ती

२) सेंटेड अगरबत्ती

दोन ते अडीच फुटांपासून ते पाच फुटांपर्यंत किंवा त्याहून अधिक उंचीच्या अगरबत्त्या बाजारात विक्रीला आल्या आहेत. पाच ते सहा फूट उंचीच्या अगरबत्त्या १൦൦ रुपयांना ५ च्या पॅकेटमध्ये येतात. तर सामान्य लांबीच्या अगरबत्त्या १൦ रुपयाला एक तर अगरबत्तीच्या एका बॉक्सची किंमत १൦൦-१५൦ पासून सुरू होते. एका बॉक्समध्ये अंदाजे १൦ ते १५ अगरबत्त्या असतात. दहा-बारा तास या अगरबत्त्या जळतात. चंदन, गुलाब, मोगरा, चाफा, मैसूर, स्वामी, रॉयवुड, पानडी, हीना अशा वेगवेगळ्या अगरबत्त्यांनी बाजारपेठा सजल्या आहेत. 



यावर्षी नवीन ब्रँडच्या अगरबत्त्या देखील बाजारात आल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पंचदीप आणि 'झेड ब्लॅक ३ इन वन' या अगरबत्त्या. म्हैसूरदीप पर्फ्युमरी हाउस ही अगरबत्ती निर्मिती करणारी अग्रेसर कंपनी आहे. या कंपनीतल्या ७൦ टक्के महिलांनी पंचदीप आणि झेड ब्लॅक ३ इन वन अगरबत्तीची निर्मिती केली आहे. या कंपनीत जवळपास १൦൦ प्रकारचे सुगंध आणि ४൦൦ प्रकारचे अत्तर वापरून अगरबत्ती तयार केली जाते.


झेड ब्लॅक ३ इन वनमध्ये नावाप्रमाणेच तीन विविध सुगंधांचा मेळ आहे. हे सुगंध प्रार्थना आणि कठोर परिश्रम यांचे प्रतिक आहेत.

अंकित अगरवाल, संचालक, एम. डी. पी. एच



१९९९ सालापासून पंचदीप हा ब्रँड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पंचदीप या अगरबत्तीत फ्रुटी, फ्लोरल, फौगेरे स्वीट यांचा समावेश आहे. पंचदीपमध्ये जवळपास २൦ फ्लेव्हर उपलब्ध आहेत.

दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील चिनी अगरबत्त्या बाजारात उपलब्ध आहेत. पण बहुतांश दुकानदारांनी यावर्षी चिनी अगरबत्त्यांवर बहिष्कार टाकला आहे. दादर ब्रिजखाली असलेल्या एका अगरबत्ती विक्रेत्याने सांगितले की, "आम्ही चिनी मालावर यावर्षी बंदी घातली आहे. कारण त्यामुळे भारतात बनवण्यात येणाऱ्या अगरबत्त्यांना किंमत मिळत नाही. भारतातसुद्धा चांगल्या आणि विविध प्रकारच्या अगरबत्त्या तयार होतात. पण चिनी मालामुळे त्याकडे दुर्लक्ष होते. म्हणून आम्ही चिनी माल विक्रीस ठेवलाच नाही." पेट्रोल दरवाढ, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किंमती, नैसर्गिक घटकांची कमतरता यामुळे अगरबत्ती व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.



हेही वाचा

गणेशोत्सवात 'असे' व्हावे प्रसादवाटप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा