'अंधेरीचा राजा'चं राजेशाही विसर्जन

अंधेरी - गेल्या १५ दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर सोमवारी ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत अंधेरीच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी पावसाची तमा न बाळगता भाविकांनी मोठ्या उत्साहात राजाला निरोप देण्यासाठी मिरवणुकीत सहभागी झाले होते. मंगळवारी सकाळी 10 ते 11 च्या दरम्यान वर्सोवा चौपाटीवर वरुण राजाच्या साक्षीने बाप्पाला निरोप देण्यात आला.

Loading Comments