Advertisement

पुढच्या वर्षी लवकर या..! भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप


पुढच्या वर्षी लवकर या..! भावपूर्ण वातावरणात लाडक्या बाप्पाला निरोप
SHARES

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात मुंबईतील अकरा दिवसांच्या गणरायाचे मोठ्या जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. यांत घरगुती आणि गणेशोत्सव मंडळाच्या लहानमोठ्या गणेश मूर्तींचा समावेश होता. लालबागच्या राजासह दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जन पहाटेपर्यंत सुरूच होते.

आता वर्षभरानंतरच गणेशोत्सवाचा जल्लोष अनुभवता येणार असल्याने मुंबापुरीतील हा देखणा नजारा डोळ्यात सामावून घेण्यासाठी मुंबईतील गिरगाव, दादर, जुहू आणि वर्सोवा अशा सर्वच प्रमुख चौपाट्यांवर अबालवृद्धांची गर्दी उसळली होती.



मुंबईतील प्रसिद्ध मंडळांचे गणपती बघायचे झाल्यास भाविकांना १० दिवसही अपुरे ठरतात. त्यातुलनेत गणेश विसर्जन मिरवणुकीत एकाच दिवसात बहुतांश सर्वच लोकप्रिय गणपतींचे दर्शन होत असल्याने भाविक गिरगाव चौपाटीवर प्रामुख्याने गर्दी करतात. त्यानुसार रात्री ८ वाजेनंतर गिरगाव चौपाटीवर आणि विसर्जन मिरवणुकीच्या सर्वच मार्गांवर भाविकांनी दुतर्फा गर्दी केली होती. ही गर्दी रात्री १२ वाजेपर्यंत कायम होती.



ग्रँटरोडचा राजा ठरला 'मुंबईचा राजा'

लालबागच्या राजासह, गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, धोबीतलावचा महाराजा, फोर्ट मार्केटचा गणराज, काळा चौकीचा महागणपती, काळबादेवीचा महागणपती, गणेश नगरचा गजमुख, भगतवाडीचा विघ्नहर्ता, मरीन ड्राईव्हचा सम्राट, मांडवीचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गिरगावचा राजा आणि ग्रँडरोडचा राजा अशा सर्वच प्रसिद्ध गणपतींचे दर्शन भाविकांनी घेतले. यापैकी ग्रँटरोडच्या राजाला 'मुंबईचा राजा २०१७' हा पुरस्कार देण्यात आला.



मुंबईभरातील ६९ नैसर्गिक जलस्थाने आणि ३२ कृत्रिम तलावांवर महापालिकेने गणेश विसर्जनाची सोय उपलब्ध करून दिली होती. शहरातील विविध विसर्जनस्थळांवर ७,०३४ सार्वजनिक, तर ३३,३५० घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. तर १८८ गौरींचेही विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तलावांमध्ये १६४ सार्वजनिक तर २,७५८ घरगुती गणेश आणि ५ गौरीचे विसर्जन झाले.

मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार रात्री १२ वाजेपर्यंत जुहू चौपाटीवर १,९४५ घरगुती आणि २४९ सार्वजनिक बाप्पांचे विसर्जन करण्यात आले होते. तर, दादर चौपाटीवर रात्री १० वाजेपर्यंत ८१५ घरगुती आणि १७० सार्वजनिक गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा