• दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
  • दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
  • दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
  • दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
  • दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
  • दिवाळीनिमित्त सजली दादरची बाजारपेठ
SHARE

प्रकाशाचा उत्सव असलेला सण म्हणजे दिपोत्सव. दिवाळी ही अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळीनिमित्त सगळीकडं दिवाळीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. घरातील साफसफाईपासून नवीन वस्तू खरेदी करण्यात सगळे व्यस्त असल्याचे दिसत आहे. तसंच, विविध तोरण, रांगोळ्या व आकाशकंदील, पणत्या यांच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढू लागली आहे.

दिवाळीनिमित्त सगळ्यात आधी बाजारात रांगोळी आणि आकाश कंदील विक्रीसाठी वेगवेगळ्या रंगाचे आणि आकाराचे आकाश कंदील यंदा बाजारात विक्रीसाठी आले आहेत. दादरमधील बाजारपेठेत रहिवाशांनी कंदील आणि रांगोळी खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. तसंच दिवाळीला आता केवळ एक आठवडा शिल्लक असल्यानं लोकांनी फराळाच्या तयारीला ही जोरदार सुरूवात केली आहे.


पणत्यामध्ये अनेक प्रकार

दिवाळीनिमित्त यंदा बाजारात अनेक प्रकारच्या पणत्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहेत. सुंदर नक्षीकाम केलेल्या आणि चमकीदार छोट्या-मोठ्या आकर्षक पणत्यांना बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी मिळत आहे. या पणत्यांची किंमत १० रुपयांपासून १०० ते १५० रुपयांपर्यंत आहे.


आकर्षित कंदील

दिवाळीनिमित्त दारात कंदील लावला जातो. दरवर्षी वेगवेगळ्या डिझाइनचे कंदील बाजारात विक्रीसाठी येत असतात. यंदाही कंदीलांमध्ये अनेक प्रकार दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. आकाश कंदील, स्टार, कापडी कंदील, यांसारखे आकर्षित कंदील खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत ग्राहकांनी मोठी गर्दी केली आहे. या कंदीलांची किंमत २०० रुपयांपासून १५०० रुपयांपर्यंत आहे.

रांगोळ्यांचे स्टॉलही सजले

दादरमधील मार्केटमध्ये वेगवेगळ्या रंगांच्या रांगोळ्यां उपलब्ध झाले आहेत. ५ रुपयांपासून ५० रुपयांच्या रांगोळ्यांचे पाकीटे विकली जात आहेत. त्याचप्रमाणं वेगवेगळ्या डिझाईनचे रांगोळ्यांचे साचे देखील उपलब्ध झाले आहेत.

नवरात्रोत्सव संपला की तातडीनं लोकं दिवाळीच्या वस्तूंच्या खरेदीची तयारी करत असतात. त्यामुळं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवसापासून खरेदीला सुरूवात झाली आहे. नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन कपड्यांची, गिफ्ट कॉर्नर यांची दुकाने रात्र उशिरापर्यंत ठेवली जात आहे.हेही वाचा -

पीएमसी घोटाळा : चेक न वटवताच दिले १०.५ कोटी

आरेच्या मुद्द्यावर आमच्या आमदारबाई मूग गिळून बसल्या, पण मी शेवटपर्यंत लढणार- युवराज मोहितेसंबंधित विषय
ताज्या बातम्या