शिवसेनेची दिवाळी हुतात्म्यांच्या कुटुंबियांसोबत

 BDD Chawl
शिवसेनेची दिवाळी हुतात्म्यांच्या कुटुंबियांसोबत

वरळी - पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे आणि शिपाई राहुल कांबळे हे कर्तव्य बजावताना हुतात्मे झाले. घरचा आधारच हरपलेल्या या वीरांच्या कुटुंबीयांची सोमवारी आमदार सुनील शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह भेट घेतली. या वेळी त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि दिवाळी फराळाचंही वाटप करण्यात आलं. ऑगस्ट महिन्यात वांद्रे येथे पेट्रोल पंपावर कर्तव्य बजावताना वाहतूक पोलीस हवालदार विलास शिंदे यांचा मारहाणीत मृत्यू झाला तर ऑक्टोबर महिन्यात संभाजीनगर येथे शिक्षकांच्या मोर्चात ड्युटी बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं पोलीस कर्मचारी राहुल कांबळे यांचा मृत्यू झाला होता. या दोघांचीही कुटुंबं वरळीच्या बीडीडी चाळीत राहतात. आमदार शिंदे यांनी या दोन्ही कुटुंबीयांच्या घरी भेट देऊन ५० हजारांची आर्थिक मदत तसंच दिवाळी फराळ देत त्यांचं सांत्वन केलं.

Loading Comments