Advertisement

कधी भाज्यांत...तर कधी फळांत...कुठे कुठे दिसतात बाप्पा!


कधी भाज्यांत...तर कधी फळांत...कुठे कुठे दिसतात बाप्पा!
SHARES

आजपर्यंत आपण अनेक मूर्तीकार पाहिले असतील. पण, भाज्या किंवा फळांमध्ये बाप्पाचे रुप शोधून त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या अवलियाला तुम्ही नक्कीच पाहिले नसेल!



दत्ताराम काणेकर हे गेली 35 वर्ष गणपतीची पूजा-अर्चा करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी त्यांच्या घरी कुठल्या ना कुठल्या भाजीत, फळात गणपती येतो. त्यामुळे त्यांनी यावर्षी या वेगवेगळ्या गणपतींच्या रुपांचे प्रदर्शन फोटोस्वरुपात भरवले आहे.



प्रभादेवी इथल्या रविंद्र नाट्य मंदिराच्या आर्ट गॅलरीत हे फोटो प्रदर्शन भरवण्यात आले आहे. त्यात शिमला मिरचीतला गणपती, गाजरातला गणपती, आंब्यातला गणपती, काकडीतला गणपती, बटाट्यातला गणपती अशा एकूण 40 प्रकारच्या गणपतींच्या फोटोंचं प्रदर्शन भरवलं आहे. या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण म्हणजे शेणापासून बनवलेला गणपती. या मूर्तीला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत.



गणपतींसोबतच गणपतीच्या पूजेला वाहिल्या जाणाऱ्या 21 वनस्पती पत्री देखील या प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत.



ज्यावेळी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते, त्यावेळी पूजेसाठी 21 पत्रींचा वापर केला जातो. माझ्या अभ्यासातून मला जवळपास 40 वनस्पती सापडल्या आहेत. दूर्वांचे एकूण 260 प्रकार आहेत. ज्याचा वापर आयुर्वेदातही केला जातो.

दत्ताराम काणेकर, गणेशमूर्ती संग्रहक



दत्ताराम काणेकर यांनी आपल्या छंदाचे रुपांतर हळूहळू अभ्यासात केले आहे. त्यातून यांनी आतापर्यंत 4000 गणपतींचा संग्रह तयार केला आहे. त्यांच्या या छंदाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. त्यामुळे मुंबईतही एक गणपती संग्रहालय व्हावे, अशी इच्छा काणेकर यांची आहे. त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत.





हेही वाचा - 

बंधनात अडकले बाप्पा

पर्यावरण संवर्धनाचा 'ट्री गणेशा'


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा