SHARE

'नवसाला पावणारा राजा' अशी ख्याती असलेल्या 'लालबागचा राजा'च्या चरणी गणेशोत्सवाच्या पहिल्या पाच दिवसांतच कोट्यवधी रुपयांचं दान जमा झालं आहे. लालबाग राजाच्या चरणी आतापर्यंत 2 कोटी 64 लाखांचं दान गणेशभक्तांनी जमा केलं आहे. अजूनही ही मोजणी सुरूच आहे.

सोन्याची मूर्ती दान

लालबागच्या राजाला दरवर्षी भाविक भरभरून दान देत असतात. मात्र, यंदा एका भाविकानं बाप्पाच्या चरणी गणपतीची सोन्याची मूर्ती दान केली आहे. ही मूर्ती १ किलो २७१ ग्रॅमची असून याची किंमत तब्बल ४२ लाख रुपये इतकी आहे. या मूर्तीच्या मुकूटामध्ये एक हिरा देखील लावण्यात आला आहे. हा हिरा अंदाजे १ लाख रुपयांचा असल्याचं म्हटलं जात आहे.


मोजणी सुरूच

दरवर्षी मुंबईसह राज्यभरातून भाविक लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी करतात. त्याचप्रमाणे दिग्गज नेत्यांसह, अभिनेतेही राजाच्या दर्शनासाठी येथे येत असतात.  गेल्यावर्षी भाविकांनी 'लालबागच्या राजा'ला ६.७५ कोटींचं दान केलं होतं. मात्र, यंदाच्या वर्षांची मोजणी अजूनही सुरू असून या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.


हेही वाचा - 

लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

५ दिवसांच्या गौरी-गणपतींना निरोप

संबंधित विषय
ताज्या बातम्या