Submitting your vote now...
पॉवर प्लेमध्ये कोणता संघ अधिक धावा करेल?
*One Lucky Winner per match. Read T&C
व्होट केल्याबद्दल धन्यवाद. कृपया तुमची माहिती खाली भरा, म्हणजे तुमच्या संपर्कात रहाणं सोपं होईल.
Enter valid name
Enter valid number

लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये जुंपली

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विरूद्ध दिशेने आत आणण्याचा प्रयत्न एका कार्यकर्त्यांने केला. राजाच्या मूख दर्शनाच्या रांगेतून त्यांना थेट नवसाच्या रांगेत घुसवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा पोलिस गर्दी पांगवत असताना नवसाच्या रांगेत घुसू पाहणाऱ्यांना पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी रोखलं. त्यावरून कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये वाद झाला.

  • लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
  • लालबागचा राजाच्या दरबारात पोलिस-कार्यकर्त्यांमध्ये जुंपली
SHARE

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांत पुन्हा एकदा बाचाबाची आणि धक्काबुक्की झाल्याचा प्रकार मंगळवारी दुपारी समोर आला आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार भाविकांना दर्शन घेतल्यानंतर पुढे होण्याची विनंती करत होती. त्यावेळी कार्यकर्त्यांच्या ओळखीच्या व्यक्ती विरूद्ध दिशेने दर्शनासाठी येत असल्याचं पाहिल्यानंतर कुमार यांनी त्यांना रोखलं त्यावरून कार्यकर्ते आणि कुमार यांच्यात वाद झाल्याचं म्हटलं जात आहे.
वादाला तोंड कसं फुटलं?

लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आपल्या ओळखीच्या व्यक्तीला विरूद्ध दिशेने आत आणण्याचा प्रयत्न एका कार्यकर्त्यांने केला. राजाच्या मूख दर्शनाच्या रांगेतून त्यांना थेट नवसाच्या रांगेत घुसवण्याचा त्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा पोलिस गर्दी पांगवत असताना नवसाच्या रांगेत घुसू पाहणाऱ्यांना पोलिस उपायुक्त अभिनाश कुमार यांनी रोखलं.
बाचाबाची आली धक्काबुक्कीवर

त्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांना ओळखीच्या व्यक्तींना आत सोडण्याचा आग्रह केला. पण भाविकांची गर्दी लक्षात घेता कुमार यांनी ते शक्य नसल्याचं सांगिल्याने कार्यकर्ते कुमार यांच्याशी वाद घालू लागले. हा वाद इतका चिघळला की कार्यकर्ते पोलिसांना थेट धक्काबुक्की करू लागले. त्यावेळी पोलिसांनी संबधित कार्यकर्त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता. इतर कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत पोलिसांची मनधरणी केल्याचं म्हटलं जात आहे.


दर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली होती. त्यावेळी भाविकांना पुढे जाण्यासाठी विनंती करत असताना. काही जण विरूद्ध दिशेने नवसाच्या रांगेत जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना रोखल्यामुळे कार्यकर्ते पोलिसांशी हुज्जत घालत होते. त्यांना समज देण्यात आली असून परिस्थिती आता नियंत्रणात आहे.
- अभिनाश कुमार, पोलिस उपायुक्त, झोन ३हेही वाचा-

कृत्रिम तलावांमधील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच!

तर, विसर्जन मिरवणुकीत खुशाल वाजवा डीजे- राज ठाकरेसंबंधित विषय