Advertisement

गणेशोत्सव २०१९: 'कडधान्यातला बाप्पा' अवतरला श्री साई दर्शन मित्र मंडळात


SHARES

जंक’ फूड म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर पिझ्झा, बर्गर किंवा तत्सम पदार्थ तरळायला लागतात. अनेक लहान मुलं जंक फूडचं प्रचंड प्रमाणात सेवन करत असून, कडधान्यांकडं त्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळं जंक फूडपासून होणारा त्रास टाळण्यासाठी तसंच लहान मुलांना कडधान्यांच महत्वं कळावं यासाठी मुंबईतल्या मालाड येथील 'श्री साई दर्शन मित्र मंडळात' कडधान्यांच्या रुपातला बाप्पा अवतरला आहे.


इकोफ्रेंडली मूर्ती

'श्री साई दर्शन मित्र मंडळ' यंदा ५८ वं वर्ष साजरं करत आहे. यानिमित्त मंडळानं कडधान्यांचं महत्व सांगणारं बाप्पाचं देखणं रूप साकारलं आहे. ही मूर्ती इकोफ्रेंडली असून, यामध्ये कडधान्य आणि टिशू पेपरचा वापर करण्यात आला आहे. तसंच देखावा सादर करण्यासाठी शेण, कपडे आणि आर्टीफिशीअल फुलांचा वापर करण्यात आला आहे.

मूर्तीचं वजन ८० किलो

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील मूर्तीचं वजन जास्त असतं. परंतु, या मूर्तीचं वजनं फक्त ८० किलो आहे, तसंच लहान बाप्पाच्या मूर्तीचं वजन खूपचं कमी आहे. विशेष म्हणजे उंदीर देखील कागदाच्या लगद्यापासून बनविण्यात आला आहे.

आठवणींना उजाळा

'श्री साई दर्शन मित्र मंडळ' दरवर्षी समाजाला सामाजिक संदेश देणारा देखावा सादर करतं. गेल्यावर्षी या मंडळाने 'सेव्ह द ट्री' हा संदेश लाकडाचा वापर करून बाप्पाची मूर्ती साकारली होती. दरम्यान, २०११ सालापासून हे मंडळं वेगवेगळ्या रुपात बाप्पाची मूर्ती साकारत आहे. २०१२ मध्ये चॉकलेटचा वापर करून गणपतीची मूर्ती साकारली होती. तसंच, २०१५ मध्ये खोडरबरचा वापर करून सोशल मीडियावर आधारित मूर्ती साकारली होती.हेही वाचा -

१० मिनिटांत लालबागच्या राजाचं दर्शन, पावसामुळे गणेशभक्तांची गर्दी ओसरली

गणेशोत्सव २०१९: दीड दिवासाच्या बाप्पाला निरोपसंबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा