साईभक्तांचं संमेलन

शिवाजी पार्क - सर्वधर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या महासमाधीला आज 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. त्या निमित्तानं 15 आणि 16 ऑक्टोबरला जांबोरी मैदानात श्री साई भक्त मंडळाच्या वतीनं संमेलनांच आयोजन करण्यात आलंय. भाविकांसाठी या संमेलनात विविध कार्यक्रमांची भरगच्च मेजवानी असेल. " त्यामुळे सर्व साईभक्तांनी आवर्जून यावं," असं अावाहन श्री साई भक्त मंडळाचे अध्यक्ष सच्चिदानंद अप्पा यांनी केलंय.

या संमेलनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर स्नेहल आंबेकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, साईबाबांचे निस्सीम भक्त अभिनेते मनोज कुमार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आदी मान्यवरही उपस्थित असतील. या संमेलनाविषयी अधिक माहितीसाठी www.shreesaibhaktamandal.com या संकेतस्थळाला भेट द्या.

 

Loading Comments