घाटकोपरमध्ये वारकरी संप्रदायाची शोभायात्रा

घाटकोपर - शिवसेनेच्या शाखा क्रमांक 131 च्या वतीने गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रेचे आयोजन केले होते. 11 वाजता सुरू झालेली शोभायात्रा दुपारी 2 वाजेपर्यत होती. ढोल आणि लेझीमच्या गजरात सर्व परिसर मंत्रमुग्ध झाला होता. 

घाटकोपर पूर्व येथील पंतनगरची सेनेची शाखा 131 येथून शोभा यात्रेला प्रारंभ झाला होता. त्यानंतर या यात्रेने महाराष्ट्र मंडळ शाळा, रायगड चौक, जनता कॉलनी, पॉप्युलर हॉटेल, बाबली पाडा, ओडियान स्विमिंग पूल, तीन मंदिर नाका, म्हाडा कॉलनी, गणेश मंदिर, सावरकर चौक, शिवराज चौक असे मार्गक्रमण केले.

शोभायात्रेत वारकरी संप्रदाय मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. या शोभायात्रेत तरुण-तरुणींपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या शोभायात्रेत वारकऱ्यांची दिंडी ही विषेश लक्ष्यवेधी ठरली होती. शिवसेनेची शाखा 131 येथे शोभायात्रेचा समारोप झाला. शोभायात्रेत सहभागी झालेल्या स्थानिक नागरिकांनी वारकऱ्यांच्या टाळ-मृदुंगाच्या तालावर ताल धरला होता. वारकऱ्यांचे रिंगणदेखील पाहण्यासारखे होते.

Loading Comments