मराठी नववर्षाचे भव्य दिंडी यात्रेने स्वागत

 Mulund
मराठी नववर्षाचे भव्य दिंडी यात्रेने स्वागत
मराठी नववर्षाचे भव्य दिंडी यात्रेने स्वागत
See all
Mulund, Mumbai  -  

मुलुंड - गुढीपाडवा म्हणजेच मराठी नववर्षाचे स्वागत मुलुंडकरांनी भव्य दिंडी आयोजित करून केले. मुद्रा संस्थान मार्फत या दिंडीचे आयोजन केले होते. तसेच अन्य अनेक संस्थांनी या भव्य दिंडीमध्ये आपला सहभाग नोंदवला. लहानग्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनीच पारंपरिक वेशात या दिंडीमध्ये हजेरी लावली होती. ढोल ताशांचा गजर तर होताच, परंतु त्या सोबत ज्ञानेश्वरी या ग्रंथाची पालखी देखील या दिंडीमध्ये लक्ष वेधून घेत होती.

या सोबतच वारकऱ्यांचे भजन तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई तसेच खंडेराय आणि म्हाळसादेवी यांच्या वेशभूषेतील लहानगे या दिंडीची भव्यता वाढवत होते. हेरंब कला अकादमीमार्फत मंगळागौर तसेच देवीचा गोंधळदेखील या दिंडीत सादर केले गेले. यावेळी महिलांनी नऊवारी आणि त्याला साजेसा असा शृंगार केला होता. मुलुंड पूर्वेकडील चिंतामणी उद्यान ते संपूर्ण मुलुंड पूर्वेच्या परिसरातील दिंडी संभाजी पार्कजवळ समाप्त करण्यात आली.

Loading Comments