Advertisement

स्वयं पुनर्विकासाची 'स्वागतयात्रा', 'न्यू एमएचबी' काॅलीनीतील रहिवाशांचा पुढाकार

बोरीवली पश्चिमेकडील एमएचबी काॅलनीत राहणाऱ्या रहिवाशांनी गुढी पाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेसाठी जय्यत तयारी केली होती. ढोलताशा पथक, घोषणा देणारे फलक, सजावट अशा विविध रूपाने रहिवाशांनी कार्यक्रमाच्या आखणीत आपापला सहभाग नोंदवला.

स्वयं पुनर्विकासाची 'स्वागतयात्रा', 'न्यू एमएचबी' काॅलीनीतील रहिवाशांचा पुढाकार
SHARES

चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्रात साजरा करण्यात येणारा गुढी पाडवा सण बोरीवलीतील एमएचबी काॅलनीत मोठ्या दणक्यात साजरा करण्यात आला. या स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे रहिवाशांनी या यात्रेतून स्वयं पुनर्विकासाचं महत्त्व पटवून दिलं.   

रहिवाशांचा उत्साह

बोरीवली पश्चिमेकडील एमएचबी काॅलनीत राहणाऱ्या रहिवाशांनी गुढी पाडव्यानिमित्त काढण्यात येणाऱ्या स्वागत यात्रेसाठी जय्यत तयारी केली होती. ढोलताशा पथक, घोषणा देणारे फलक, सजावट अशा विविध रूपाने रहिवाशांनी कार्यक्रमाच्या आखणीत आपापला सहभाग नोंदवला.

स्वयं पुनर्विकासाचं महत्त्व

त्यानुसार गुढी पाडव्याला निघालेल्या स्वागत यात्रेत रहिवाशांनी फलक हातात घेऊन सर्वांनाच स्वयं पुनर्विकासाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला. या स्वागत यात्रेत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच रहिवासी सहभागी झाले होते. पुरूष, महिलांनी फेटे घालून, हाती गुढी घेऊन सणाचा उत्साह द्विगुणीत केला. ही स्वागत यात्रा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे बोरीवली कार्याध्यक्ष गणेश राहाटे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आली.

हेही वाचा-

म्हणून, मुस्लिमांना धर्माच्या आधारावर आरक्षण नाही- तावडे

आपुल्याच घरात हाल सोसते मराठी..!

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा