Advertisement

१० दिवसांच्या बाप्पांची संख्या २० टक्क्यांनी वाढली

दरवर्षी विसर्जनादरम्यान सरासरी १० टक्के गणेशमूर्तींची संख्या वाढते. परंतु यंदा २० टक्के गणेश मूर्तीची संख्या वाढलेली पाहायला मिळाली आहे. त्यानुसार यावर्षी घरगुती गणपतींमध्ये ३० हजारांनी वाढ झाली, तर सार्वजनिक गणेशमूर्तींमध्ये सुमारे २ हजार मूर्तींनी वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.

१० दिवसांच्या बाप्पांची संख्या २० टक्क्यांनी वाढली
SHARES

दहा दिवसांचा पाहुणचार घेत रविवारी गणपती बाप्पा गावाला निघून गेले. भक्तांनीही त्यांना जड अंतकरणाने निरोप दिला. यंदाच्या वर्षी गणेशोत्सवात बाप्पांची संख्या कमी झाली की काय? असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु हा अंदाज बाप्पांनी खोटा ठरवला आहे. दरवर्षी सरासरी १० टक्के गणेशमूर्तींची संख्या वाढते. परंतु यंदा २० टक्के गणेश मूर्तीची संख्या वाढलेली पाहायला मिळाली आहे. त्यानुसार यावर्षी घरगुती गणपतींमध्ये ३० हजारांनी वाढ झाली, तर सार्वजनिक गणेशमूर्तींमध्ये सुमारे २ हजार मूर्तींनी वाढ झाल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे.


गेल्या वर्षीची आकडेवारी

मुंबईत मागील १० दिवसांपासून असलेल्या गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या दिवशी झाली. परंतु दरवर्षी गणेश भक्तांच्या संख्येत वाढच होताना दिसत असून आपल्या बाप्पाला घरी आणून त्यांची पूर्जा अर्चा करण्याकडे भक्तांचा कल अधिक वाढताना दिसत आहे. मागील वर्षी ११ दिवसांमध्ये ११ हजार ९८ सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या नोंदवली गेली होती. परंतु यंदा ही संख्या १३ हजार ३४७ वर पोहोचली. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २ हजार २४९ सार्वजनिक गणेशमूर्तीँच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.


मंडळांमध्ये नाराजी

एकाबाजूला न्यायालयाच्या आदेशामुळे अनेक मंडळांना परवानगी नाकारण्यात आली होती. जाचक नियम यामुळे अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. परंतु सार्वजनिक गणेशमूर्तींची संख्या पाहता या सर्वांना न जुमानता गणेश भक्तांनी मोठ्या संख्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केल्याचं दिसून येत आहे.


विसर्जन व्यवस्था

समुद्र चौपाटी, तलाव आदी ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळांसह ३१ कृत्रिम तलावांची व्यवस्था महापालिकेच्यावतीनं करण्यात आली होती. या सर्व विसर्जन स्थळांवरून प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार सार्वजनिक गणेशमूर्तीँची संख्या वाढलेली पाहायला मिळत आहे. तर घरगुती गणेशमूर्तींमध्ये दरवर्षीच्या तुलने प्रचंड वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे.


किती हजारांनी वाढ

मागील वर्षी या सर्व विसर्जन स्थळांवर अनंत चतुर्दशीपर्यंत १ लाख ९१ हजार २५४ घरगुती गणेशमूर्तींची नोंद झाली होती. त्यातुलनेत यंदाच्या गणेशोत्सवात २ लाख २२ हजार २६ घरगुती गणेशमूर्तींची नोंद झाली आहे. त्यामुळे एरवी १० टक्के गणेशमूर्तींची संख्या वाढत असताना यंदा तर लक्षणीय वाढ दिसून येत आहे. घरगुती गणेशमूर्तींमध्ये मागील वर्षाँच्या तुलनेत ३० हजार ७७२ गणेशमूर्तींनी वाढ झाली आहे.


कृत्रिम तलावांमधील संख्या वाढली

मागील वर्षीप्रमाणेच यंदाही कृत्रिम तलावांची संख्या महापालिकेच्यावतीनं कायम ठेवण्यात आली. या सर्व तलावांमध्ये ८४३ सार्वजनिक आणि ३२ हजार ९५९ सार्वजनिक गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. तर ३२ हजार ९५९ घरगुती गणेशमूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. मागील वर्षी ६५२ सार्वजनिक आणि २८ हजार ११२ घरगुती अशाप्रकारे २९ हजार २८३ गणेशमूर्तींचं विसर्जन झालं. त्यामुळे सुमारे साडेतीन हजार गणेशमूर्तीँची वाढ झाली आहे.



हेही वाचा-

राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली, पाच जखमी

शहरात ४४ मंडप बेकायदा, महापालिकेची कबुली



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा