Advertisement

गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवलीत ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम

गणपती विसर्जनादिवशी होणारी गर्दी रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने विसर्जन तुमच्या दारी हा उपक्रम राबवणार आहे.

गणपती विसर्जनासाठी कल्याण डोंबिवलीत ‘विसर्जन आपल्या दारी’ उपक्रम
SHARES
गणपती विसर्जनादिवशी होणारी गर्दी रोखण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने विसर्जन तुमच्या दारी हा उपक्रम राबवणार  आहे. या उपक्रमात महापालिकेच्‍या प्रशासकीय प्रभागात मोठ्या ट्रकमध्‍ये ३००० लिटर पाण्‍याची टाकी बसवून मुख्‍य चौकात घरगुती गणपती विसर्जनाकरीता फिरविण्‍यात येणार आहे. प्रत्‍येक प्रभाग क्षेत्रात चौकाचौकात सदर वाहन उभे ठेवण्‍याची वेळ निश्चित करुन याबाबत उद्घोषणा करण्‍यात येणार आहे.

कल्‍याण व डोंबिवली विभागातील गणपती विसर्जन स्‍थळी व गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील चौकांमध्‍ये सुरक्षेसाठी महापालिकेने २७ महत्‍वाच्‍या ठिकाणी १२५ सीसीटीव्‍ही कॅमेरे बसविण्‍याची व्‍यवस्‍था केलेली आहे. गणेशोत्‍सवा दरम्‍यान प्रकाश व्‍यवस्‍थेसाठी विहित क्षमतेचे ५२ जनरेटर बसविण्‍यात येणार आहेत. तसंच, २३९५ हॅलोजन व ५८ लाईटिंग टॉवर उभारण्‍यात येत आहेत. महापालिकेच्‍या कल्‍याण विभागात ३१ विसर्जन स्‍थळे असतील. 

कल्‍याण पूर्व येथे गावदेवी मंदिराजवळ, तिसगाव येथे, कोळसेवाडी पोलीस स्टेशन जवळ, चक्की नाका वखारी जवळ, खडगोळवली त्‍याचप्रमाणे कल्‍याण प. येथे अनंत रिजन्‍सी, पारनाका तसेच विदयापिठ परिसरात कृत्रिम तलाव उभारण्‍यात येणार आहेत. प्रत्‍येक विसर्जन स्‍थळी अग्निशमन जीवरक्षक, लाईफबॉय, लाईफ जॅकेट इ. ची व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसंच खाडी किनारी/तलावाजवळ अग्निशमन विभागाच्‍या ५ बोटी सज्‍ज ठेवण्‍यात येणार आहे.



हेही वाचा

मिरा-भाईंदरमध्ये तलाव, चौपाट्यांवर गणपती विसर्जनास बंदी

'आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी', मनसेचा अनोखा उपक्रम




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा