Advertisement

होळीचं महत्त्व


होळीचं महत्त्व
SHARES

फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी येणारा होळी हा सण देशभरात उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक राज्यात होळी साजरा करण्यामागील पद्धत जरी भिन्न असली त्यामगील उद्देश सारखाच आहे. खरंतर प्रत्येक सण वेगवेगळे रंग आयुष्यात भरतात. पण होळी आणि रंगपंचमीत खऱ्या अर्थानं रंगांची उधळण होत असते.

फाल्गुन पौर्णिमेपासून ते पंचमीपर्यंतच्या 5-6 दिवसांत कुठे दोन दिवस तर कुठे पाच दिवस होळी साजरी केली जाते. मुंबईत होळी आणि रंगपंचमी असे दोन दिवस उत्सव साजरा केला जातो.


होळी मागचा उद्देश

दृष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून योग्य मार्ग दाखवणारा उत्सव म्हणजे होळी. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्याद्वारे वातावरणाची शुद्धी करणं हा उद्देश होळी करण्यामागे आहे. या सणात अनेक रंग उधळले जातात आणि एकमेकांमधील हेवेदावे दूर केले जातात. सर्व एकाच रंगात रंगून जातात.


होळीचं महत्त्व?

घरात सुख - शांती, समृद्धी यांसारख्या अनेक गोष्टींसाठी महिला या दिवशी पूजा करतात. होळीच्या एक महिना आधी सर्व तयारी सुरू केली जाते. सुकलेल्या विविध झाडांची फांदी जमा केली जाते आणि होळीच्या दिवशी एकत्र करून अग्नीत अर्पण करून पूजा केली जाते.


होळीसंदर्भात आख्यायिका

लहान मुलांना पीडा देणाऱ्या "होलिका", "ढुंढा", "पुतना" यांसारख्या राक्षसींच्या दहनांच्या कथांमधे या उत्सवाच्या परंपरेचा शोध काही लोक घेतात. (एका पौराणिक कथेनुसार विष्णूभक्त प्रल्हादाला मारण्यासाठी हिरण्यकशिपूने धाडलेल्या होलिकादेवीचा श्रीविष्णू देवाने वध केला होता. होलिकेला वर होतं की तिला अग्नी जाळू शकणार नाही, परंतु प्रल्हादाला जाळ्ण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीकुंडात प्रवेश केला आणि प्रल्हाद बचावला आणि होलिकेचं दहन झालं) "मदनदहना"च्या कथेत या उत्सवाची परंपराही काही लोक सांगतात.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा