Advertisement

गोरेगावच्या बेस्ट कॉलनीत कोकणी महोत्सव


गोरेगावच्या बेस्ट कॉलनीत कोकणी महोत्सव
SHARES

गोरेगाव - येथील बेस्ट कॉलनीत कोकणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. समर्थ संघटनेचे कार्याध्यक्ष राजू राजपूत यांनी कोकणी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये नृत्य आणि गायन स्पर्धेचाही समावेश आहे. खवय्यांसाठी कोंबडी वडे, मालवणी मसाले, लोणची, पापड यासारखे स्टॉल महोत्सवात मांडण्यात आले आहेत. कोकणी महोत्सवाला नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राजू राजपूत यांनी केले आहे. 29 जानेवारीपर्यंत हा महोत्सव नागरिकांसाठी खुला असणार आहे. या वेळी प्रमुख पाहुणे नगरसेविका किरण पटेल, ईच्छुक उमेदवार अजय विचारे, रुबी रुग्णालयाचे डॉ. चेतन आरोरा हे उपस्थित होते.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा