Advertisement

ठिकठिकाणी दहीहंडीचा थरथराट सुरू

र दादर, ठाणे, कल्याण यांच्यासह इतर ठिकाणी गोपाळांच्या थरांचा थरथराट सुरू झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांवर बक्षिसांची लयलूटही होईल यात शंका नाही.

ठिकठिकाणी दहीहंडीचा थरथराट सुरू
SHARES

मध्यरात्री जन्माष्टमीचा सोहळा पार पडल्यानंतर सोमवारी सकाळी दहीहंडीचा उत्साह सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दादर, ठाणे, कल्याण यांच्यासह इतर ठिकाणी गोपाळांच्या थरांचा थरथराट सुरू झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही गोविंदा पथकांवर बक्षिसांची लयलूटही होईल यात शंका नाही.


उत्सवाचा उत्साह कायम

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर २०१४ पासून दहीहंडीवर निर्बंध आले. मात्र तरीही गोविंदांमध्ये या उत्सवाचा उत्साह तसुभरही कमी झालेला नाही. यंदाही ठिकठिकाणी दहीहंड्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. तरुणाई अगदी जल्लोषात दहीहंडी फोडण्याच्या तयारीत आहे. घसघशीत बक्षिसं, विमा संरक्षण, उपचारांची सुविधा इत्यादी सोयींमुळे गोविंदा पथकांचा उत्साह आणखी वाढला आहे.


गोविंदापथक सज्ज

दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक मंडळांनी सकाळपासूनच मुंबई, ठाण्यातल्या मोठ्या हंड्या फोडण्यासाठी आता सज्ज झाल्यात. शिवाय यंदा दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यामुळे मुंबापुरीतील दहीहंडी मंडळांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. या उत्साहाच्या वातावरणात मुंबईतील नामवंत गोविंदा पथकांचा येथे थरथराट अनुभवता येणार आहे. शिवाय काही ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, लोकगीते, कोळीगीते सादर केली जाणार आहेत.


'यांचा' समावेश नाही

तर १४ वर्षांखालील लहान मुलांना मात्र गोविंदा पथकात समावेश करता येणार नाही. जर छोट्या गोविंदाना पथकात समाविष्ट केल्यास त्यांच्या पालकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला गेला आहे. त्यासाठी त्यांच्या आई-वडिलांची लेखी संमती पथकांनी घ्यावी. शिवाय राज्य सरकार आणि उच्च न्यायालयाच्या सूचनांचे पालन करण्यात यावे, असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा