शिवडी - स्पंदन युवा प्रतिष्ठान आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती शिवडीच्या वतीने मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त शिवडी पश्चिम परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेचा प्रारंभ शिवडीतील नागकन्या गुरु राणी संस्था येथून सकाळी 9 वा. झाला असून, टाकेश्वर हनुमान मंदिर येथे दुपारी 1 वा. समारोप करण्यात येईल.
या शोभायात्रेचे 10 वे वर्ष असून, मंगळा गौरी, भगवा ध्वज पथक ब्रम्हांडनायक ढोल पथक, कोल्हापुरी लेझीम पथक, पारंपरिक वेषभूषा या शोभा यात्रेचा आकर्षणाचा विषय ठरला.
या शोभायात्रेत सुप्रसिद्ध मराठी कलाकार मंगेश देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याचे प्रतिष्ठानचे मानद सचिव नंदकुमार पाटिल यांनी सांगितले.