महापरिनिर्वाण दिनासाठी पालिका सज्ज

दादर - 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांची दादर चैत्यभूमीवर गर्दी झालीय. या अनुयायांयासाठी मुंबई महानगर पालिकाही सज्ज झालीय. पालिकेकडून सोईसुविधा देण्यात आल्यात. महापालिकेच्या जी नॉर्थ विभागाकडून तर माहिती देणारे कक्षही उभारण्यात आलेत. महापरिनिर्वाण दिनाला मोठ्या प्रमाणात बाबासाहेबांचे अनुयायी दादर चैत्यभूमीवर येतात. त्यामुळे पालिकेनं अनुयायांना कोणताच त्रास होऊ नये याची काळजी घेतलीय. महापरिनिर्वाण दिनाच्या कार्यक्रमाचं मंगळवारी पूर्ण दिवस लाईव्ह प्रसारण मुंबई लाईव्ह दाखवणार आहे. 

Loading Comments