Advertisement

होळी, धुळवडीवर निर्बंध नाहीत; गृहखात्याकडून नवे परिपत्रक जारी

होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नसून, या सणाच्या निमित्तानं गृहखात्यानं मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याशिवाय नवी नियमावली जाहीर केली आहे.

होळी, धुळवडीवर निर्बंध नाहीत; गृहखात्याकडून नवे परिपत्रक जारी
SHARES

होळीनिमित्त २ दिवसांपूर्वी राज्य सरकारनं नियमावली जारी केली होती. परंतू गुरूवारी ऐन होळीच्या दिवशी राज्य सरकारनं नागरिकांना दिलासा दिला आहे. होळी, धुळवडवर राज्य सरकारचे कुठलेही निर्बंध नसून, या सणाच्या निमित्तानं गृहखात्यानं मार्गदर्शक सुचना दिल्या आहेत. त्याशिवाय नवी नियमावली जाहीर केली आहे.

कोरोना व्हायरसचं प्रमाण कमी झाल्यानं मुंबईसह राज्यात अनेक निर्बंध शिथिल केले आहेत. १७ आणि १८ तारखेला होळी, धुलिवंदनचा सण साजरा केला जाणार आहे.  

गृहखात्याकडून मार्गदर्शक सुचना व नवी नियमावली

  • एकमेकांवर रंग टाकणे, पाणी टाकणे, एकमेकांना गुलाल लावून रंगाची उधळण करण्यात येते. यंदाची होळी साधेपणाने साजरी करावी.
  • कोविड संक्रमणामुळे हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणुक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा. 
  • होळी, शिमगा निमित्त विशेष करून कोकणात पालखीची मिरवणूक काढण्यात येते. परंतु यावर्षी देखील पालखी घरोघरी न नेता स्थानिक प्रशासनाने उपाययोजना कराव्यात.
  • गर्दी न होण्यासाठी नियमांचे तंतोतंत पालन होईल याकडे सर्वतोपरी लक्ष देऊन योग्य ती दक्षता घ्यावी. 
  • कोवीडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण तसेच संबंधित महानागरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे पालन करावे.
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा