Advertisement

गुढी पाडव्यानिमित्त धारावीत शोभायात्रा


गुढी पाडव्यानिमित्त धारावीत शोभायात्रा
SHARES

धारावी - गुढीपाडव्यानिमित्त धारावीतील महाराष्ट्र सांस्कृतिक उत्सवाच्या वतीने भव्य शोभायात्रा काढण्यात आली. यामध्ये धारावीतील प्रमुख 50 सार्वजनिक मंडळे सहभागी झाली होती. महाराष्ट्र सांस्कृतिक मंडळाचे यंदाचे 9वे वर्ष आहे. या सोहळ्यामध्ये पारंपरिक वेशभूषेत तरुणाईचा जल्लोष पाहण्याजोगा होता. ढोलताशांचा गजर, लेझीम पथक, झांज पथक आणि धारावीच्या गणेश मंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक संदेश देण्यात आला. चित्ररथामध्ये झाडे लावा, पाणी वाचवा, पर्यावरणाविषयी तसेच स्वच्छतेचा नारासुद्धा या शोभायात्रेतून देण्यात आला. या वेळी धारावी पोलिसांच्या वतीने शोभायात्रेत गुलाबफुले आणि अल्पोपहार देण्यात आला. त्याचबरोबर काही प्रमुख मंडळांच्या वतीने जागोजागी स्वागताची तयारी करून पाणीवाटप, सरबत वाटप, बिस्कीट वाटप करण्यात आले होते.

या शोभायात्रेची सुरुवात धारावीतील धारेश्वर शिवमंदिर येथून संत कक्कय्या मार्ग, ९० फीट रोड, संत रोहिदास मार्ग, धारावी-कोळीवाडा असा मार्गक्रमण करत संत कक्कय्या मार्गावरील नवीन चाळ (शिवमंदिर) येथे शोभायात्रेचा सांगता सोहळा संपन्न झाला.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा